पान:भवमंथन.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८४ ) रसत्यागाची अशक्यता. विरक्त लोक बाकीचे विषय विवेकाने सोडतात, पण रस सोडणे शक्य नाहीं. पूर्वकाळी वातांबुपर्णाशनि योगी होऊन गेले; पण वातांबुपर्ण तरी पाहिजेच होते की नाहीं ! अंतकाळापेक्षां माध्यान्हकाळ कठीण. त्या वेळेस कसला का होईना, पण गोळा दिलाच पाहिजे, त्यावांचून सुटका नाही. सध्या तर अन्नमयच प्राण आहे. तेव्हा अन्य गति नाहींच. विरक्त आणि बद्ध ह्यांत इतकेच अंतर कीं, नाइलाज समजून काही तरी गोळा विरक्त देतो, पण त्याच्या रुचीची वगैरे पर्वा करीत नाहीं; बद् रुचीकरितां तळमळ करितो. - अहिंसा परमो धर्मः ।। मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा जीव सारखाच. जीवावरील प्रेम सर्वांस समान. माहार, निद्रा, भय आणि विहार सर्वांच्या मागे लागलेच आहेत. सुखाविषयीं अमिलाप आणि दुःखाविषयी तिरस्कार सवस सारखा आहेच. एक ज्ञान तेवढे मनुष्यास जास्त आहे, अशा ज्ञानसंपन्न माणसांनी व्याघ्रादिक हिंसक पशूप्रमाणे दुर्बळ मुक्या जनावरांचे इनन करून आपल्या पोटाची खळगी भरावी, हे किती तरी नीच कम आहे ! परमेश्वरापाशी ह्या पापाबद्ल कांहींच को शासन सोसावे लागणार नाही ? सर्व धर्मामध्ये अहिंसा हा श्रेष्ठतम धर्म आहे, असे कोण विचारी मनुष्य झणणार नाही १ = {{{{ है। 11 व दुर्बळ कोट्या . छवि का है । जग निर्माणकत्र्याने सर्व प्राण मनुष्याच्या उपयोगाकरितां निर्माण केले आहे त, मांसाहार करितां यावा. म्हणूनच सुळे दांत मनुष्यांना दिले आहेस, दुर्वळ लहान प्राण्यांस प्रबळ मोठे प्राणि खातात हा सृष्टिक्रम स्वाभाविक आहे. यावरून मनुष्याने मांसाहार करावा, असा ईश्वरी संकेतच आहे, असल्या कोट्या केवळ दुर्बळ होत. असे म्हणणे म्हणजे आपण त्या क्षुद्र प्राण्यां. प्रमाणे ज्ञानहीन आहो असे पतकरणे नव्हे काय ? पूर्वावस्थेत ज्ञानाभावामुळे चरितार्थकरितां धान्यादिक निर्माण करण्याची माहिती नव्हती. म्हणून माणसांनी हिंसक पशुचे अनुकरण करून त्यांचीच वृत्ति त्या काळच्या कोत्या बाई-सामथ्र्यानुरूप स्वीकारल्या होत्या. म्हणून तो आधार दाखवून माताहार आणि मद्यपान ह्यांचे मंडन करणे ह्मणजे पाळण्यांतील बालकांच्या वृत्तीचा आधार घेऊन प्रौढांनीही भलतेच सावे, दिगांबर रहावे, आणि