पान:भवमंथन.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ८३ ) - ज्ञानाधता. लोकशी काय करावयाचे. * कुत्ता जाने चमड़ा जाने " मापलीच स्थिति पहा, एखाद्या भाग्यशाली बापाने लोकांच्या उपयोगी पडावे म्हणून पुरलेले अपार धन मुलास माहीत नसल्या कारणाने बापाच्या पश्चात दरिद्र येऊन ते द्रव्य पुरलेल्या जागेवरच मुलाने भीक मागत बसावें ! कोणी रोज मजुरी करणाराने कांहीं कवड्या व्यास दिल्या म्हणजे त्यास मोठा श्रीमान समजून त्याचा त्या मुलाने बोल्योला करावा; तशी आमची स्थिति झाली आहे. छे! छे ! तशी सुद्धा झाली नाहीं ! त्या विचा-याला आपल्या पायाखाली निधि असल्याचे काय माहीत १ पण आमचे तसें नाहीं. आह्मांस दिसण्याजोगे सत्र ठेविले अाहे. पण आम्ही तिकडे पहातच नाही. आमच्या पूर्वजांनी आम्हांस वेद आणि शास्त्र ही उपनयने दिली आहेत. आठ वर्षांचे वय झाल्याबरोबर आम्ही उपनयन ( मुंज ) धारण करून दुनियेत कोणी नाही असे जन्मी (द्विज ) व्हावे, आणि आपल्या पूर्वजांचे ज्ञानभंडार् अवोकन करून त्यास भर घालावी, अशी योजना करून ठेविली । आहे; पण आमच्या दुर्दैवाने आम्ही अंध झालो आहों. एका एका वाक्याची सुद्धां योग्यता शेक ग्रंथांत व्हावयाची नाही, अशा नीतिग्रंथांची पेर्वेची पेवे आणि कोठारेची कोठारे येथे भरलेली असता त्यांकडे कोणी लक्ष देत नाहीं. इकडूनच पश्चिमेस गेलेल्या ज्ञानरवीचा उदय पश्चिमेस झाला आहे, असे वेड्यासारखे आपण म्हणतो ! पश्चिमेस रव्युदय कधी तरी झाला आहे काय ? सापळी प्रदक्षिणा पुरी करून तो पुनः पूर्वक्षितिजाकडे जपानांत येत आहे. आह्मास दारू पिऊ नका, झणन सांगण्यास केन साहेब पाहिजेत ! आमचे पवित्र ज्ञान अधिकारविहीन-मनुष्यांस मिळू नये ह्मणून ते आम्ही । शूद्रांपासून सुद्धां लपवून लपवून ठेवीत असतां कस्तुरीच्या वासाप्रमाणे आमच्या दिव्य ज्ञानांचे तेज पृथ्वीच्या उत्तरसीमेपर्यंत प्रकाशले असून आम्हांस गीतातत्व सांगण्यास अनुनाई पाहिजे ! आमच्या दारी भीक माग णारे भिकारी, आणि जात्यावर ओंव्या झणणाच्या बायका ह्यांच्या तोंडातन सुद्धां कित्येक अमोलिक नीतितवें सहज निघतात, पण तिकडे कोण लक्ष देतो. सारांश, या युगात धर्म आणि नीति पार लुप्त होऊन आहार विहार ह्यास म्हणजे रस आणि स्पर्श ह्यांतच काय ते प्रधानत्व मिळाले आहे !