पान:भवमंथन.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७२) च्या संकट समुद्राचा सेतु भगवान ह्याने पास सांगितले की, मनुष्याची निंदा केली असता अशखवधच केल्याप्रमाणे आहे. त्या निदेने त्याची हत्या कर ण्याचा दोष लागतो. तु धर्म राजाची निंदा त्याच्या समक्ष कर म्हणजे त्याच्या वधाची तुझी प्रतिज्ञा सत्य होईल. भांबावलेला अर्जुन युक्त सांपडली म्हणून हर्षभरित झाला, उणि त्याने युधिष्टिाची निंदा तर केलीच, पण लागलेच त्याला स्मरण झाले की राजधमची निंदा करणारात के इनान घालण्याची आपली प्रतिज्ञा आहे, म्हणून आपला बाणानेच आपला प्राणवात करण्यास सिद्ध झाला. पुन्हा भगवंतांनी त्याचे समाधान करून त्यास सांगितले की, स्वमुलाने आपली स्तुति केली असता आत्महत्तेचा देष लागतो. ह्यासाठी तू आपली स्तुति करून प्रतिज्ञाभंगाच्या दोषांतून मुक्त हो. पापपुण्याचा विचार । न केला तरी आत्मस्तात आणि परनिंदा हे दोन्ही प्रकार फार तापदायक आहेत. पापपुण्य एकीकडे ठेविले तरी मागे लिहिल्याप्रमाणे अात्मस्तुतीचे दुष्परिणाम। होऊन आत्मघात होतो. परनिंदेमुळे तर फारच अनर्थ होतात पनिंदा तोंडावर केली तर लागलाच कलह होतो. बहुधा तोंडावर कोणी कोणावी निंदा करीत नसून पश्यातच करितात. नारदवृत्तीची माणसे सर्वत्र असतात आणि परनिंदा दुस-या माणसाशी बोलण्यांत होत असते, यामुळे ती बातमी ज्याची निदा त्यास आयतीच वाढीदिढी सुद्धा पोहोचते. कदाचित निंदा करण्याचा हेतु नसून सद्धेतूने बोललेल्या शब्दाच्या हेतूचा विपर्यास करून चुगलीखोर लावालावी करितात. कितीएक वेळ वरिष्ट अधिकारी किंवा बलिष्ट यांची केलेली निंदा त्यांच्या कानांवर जाते,तेणेकरून दुर्बलनिंदकाचा सहज चुराडा होऊन जातो. आत्मस्तुतीच्या शतपट हानि परनिंदेमुळे होते. पर नैदा करणारांत लाम मुळीच नसतो, पण आपली स्तुति करण्याची चटक लागली म्हणजे नामस्ततीचे संमर्थन करतांना निंदा सहजच होते. दुनियेंत काय तो शाणा, रूपवान, धनवान आणि सद्वर्तनी मी असे म्हणावयाचें मनांत आले की पडोसा दुस-या- चा दाखवून त्यांची निंदा ओघासच येते. केवढा हा आपल्या हाताने आपल्या घरास कोलत्या लावण्याचा अव्यापारेषु व्यापार ! र निकांचे उपकार. - निंदकाचा नाश न करितां आपल्या अंगी कांहीं व्यंग किंवा दोष आहे की काय याचा शोध करून सज्जन आपली सुधारणा करून घेतो, आणि निंदकाचे