पान:भवमंथन.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१) सातरी होते की, नियामकाचा शोध लावणे अशक्य आहे. पण कोणी तरी नियामक आहे ह्यांत शंका नाहीं. नरजन्मामध्ये येण्याचे सार्थक या नियमाचा शोध लावणे, निदान त्या शोधाचा निदिध्यास लागणे, येवढेच अाहे. ते प्राप्त करण्याची कल्पना ज्या ह्या रूपाविषयांच्या योगाने येते, त्या विषयाचे महत्त्व किती म्हणून वर्णन करावे. . . . , ,

नेत्रांचे सार्थक है - त्या नियामकाचा शोध करणारे अनादिकालापासून जे ज्ञाते झाले, त्यांनी आपल्यासारख्या अज्ञान जनचा उद्धार होण्याकरिता अनेक तीर्थ, क्षेत्रे, यो: जून ठेवून तेथें मनोरम देवालये बांधली आहेत. घाट व दीपमाळा बांधल्या आहेत. हजारों, लाखों रुपये सालाचे खर्च ठेवून देवाच्या उत्साहाचे, विलासाचे नानाप्रकार चालू ठविले आहेत. त्या क्षेत्री जाऊन तेथील अनुपम शोभा पहाणे, भगवंताच्या मूर्तीचे दर्शन घेऊन जन्माचे सार्थक करणे, ज्याच्या भाग्यांत असते, त्यास तो लाभ रूप या विषयानेच होतो. तशा ठिकाणी जगदोद्धार करणा-या संतांच्या दर्शनाने नरतनूचे सार्थक होऊन केवढा लाभ होतो पहा, | सतदर्शनी हा लाभ । पद्मनाभ जोडिला । | ६ | ];7F | 5

    • - | पापा तापा वारी वारी मल वारि वारि भूमाता ॥ | रोग निवारी वारिच वारिच पिकवी समुद्र भूमाता ॥

| ( स्वरुत.) • ः = सर्व उत्पत्ति रसापासून. ] • आपल्या महाभूताचा विषय रस होय. पाण्यामधील सांका, शेवाळ, जलचरांचे मृतदेह, ह्यानीच पृथ्वी झाली. ही रसापासून झाली म्हणून हिला रसा म्हणतात. मेदापासून झाली म्हणून मेदिनी म्हणतात. पृथ्वीच जर रसापासून झाली, तर तिजवरील सर्व पदार्थांचा उगम रसापासून झाला आहे, हे निराळे सांगणेंच नलगे. शब्द, स्पर्श, रूप, आणि गंध हे विषय ज्या पदार्थांचा आश्रय क्ररणारे, ते सर्व पदार्थ पृथ्वीपासून व रसापासून प्रकट झाले. तेव्हां रसाची महती काय वर्णन करावी. खारट, तुरट, आंबट, कडू आणि गोड, असे रसाचे सहा प्रकार आहेत. प्राणिमात्राच्या जीवनास जीवन पाणीच आहे. आणि त्याच्या