पान:भवमंथन.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) नाहीं सग शोध होणार कसा ? तशी कल्पना ठरल्यावर सुद्धा प्रयोगाअंती पूर्वानुमानाप्रमाणे मिश्रणांत धर्म उतरले नाहीत किंवा इच्छिले फळ प्राप्त झालें नाहीं, तर कोठे चुकते आहे, आणि ती चूक काढून टाकण्यास काय तजवीज करावी, हे पुन्हां नीरिक्षणावाचून कळण्यास मार्गच नाहीं. तात्पर्य, सर्व ज्ञानाचा उगन नीरिक्षणापासून म्हणजे रूपविषयापासूनच झाला आहे. 3 ईश्वराविषयी कल्पना. ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना मनांत येण्यास तरी है नेत्रयुगलच कारण आहे. विश्वाचा अवाढव्य पसारा, त्याचा नियंत्रित वर्तनक्रम, सर्व वस्तुमात्रासुद्ध विश्वाच्या मागे लागलेला, सृष्टिस्थितिलयक्रम, पंचमहाभूतांचे अतक्र्य सामथ्य, पुन्हा त्या सामथ्याचे विलक्षण नियमन, त्यांचे परस्परांशी असलेले विरोध,प्रत्यक्ष दिसत असून पुन्हा त्यांचे एकमेकांमध्ये असलेले सख्य आणि मिश्रण, क्वचित होणारे त्यांचे भयंकर आणि सर्वविध्वंसक क्षोभ, प्राणिमात्राचे परिभ्रमण, त्यांचा सर्वकाल चाललेला जीवनाथ कलह, जीवो जीवस्य जीवनं असा धडधडीत प्रकार असून, आयुर्मर्यादा असेपर्यंत त्यांचे निर्भय विहार, मनुष्याच्या अकुंठित बुद्वीचे नानाविध विलास सर्व दुनियेवर व प्राण्यांवर गाजत असलेला त्याचा अमल, पण त्या अमलाने घडी मान. ण्यास त्यास कारण नाहीं तें नाहींच. कारण, एका क्षणात धनदौलतीची काय वाट होईल, ह्याचा मुळीच भरंवसा नाहीं... धनदौलत असो, पण तो मी मी म्हणणारा देहही कोणच्या क्षणीं पतन पावून पुन्हा मातीस माती मिळून जाईल याचा नेम नाहीं. इत्यादि अनंत गोष्टी पाहूनच मनुष्याची क्षुद्रता स्यास दिसून आली. आपल्याप्रमाणेच सर्व विश्वाचा प्रकार असल्याचे श्यास दिसून आले, म्हणजे एवढा हा अतयं पसारा नियमाने चालण्यास कोणा तरी नियामकाची सत्ताच कारण असली पाहिजे. अशी कल्पना शो. धकबुद्धीच्या मनुष्याच्या मनात येते. अर्थातच तो त्या नियामकाच्या शा. धास लागतो. उंबरीतील कीटक किंवा घड्याळावरील मुंगी यांची पृथ्वी, उंबर किंवा घड्याळ हिचा शोध ते करूं लागल्यास, त्यांचा जसा परिणाम होईल, म्हणजे प्रथम त्यांस त्यांच्या पृथ्वीपलीकडे कांहीं असल्याची कल्पना येणार नाही, पण ते उंबर फुटले किंवा ती मुंगी भिंतीवर गेली म्हणजे जशी तिची अवस्था होईल त्याप्रमाणे शोधकाची अवस्था झाली म्हणजे त्याची