पान:भवमंथन.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) | नाम, कथा आणि नीति, शब्द विषयाच्या सगळ्या महतीपेक्ष हरिनामें व हरिकथा शब्दमय माहेत हे त्यास श्रेष्ठतम महत्व आहे. नीतिशिक्षण आणि नीतिप्रसार हा शब्दांनीच होतो. पूर्वी पहाटे उठून भूपाळ्या स्वतः म्हणून मुलांकडून म्हणवीत असत. प्रातःस्मरण करीत असत. वृद्ध व फुरसतीची माणसे देवालयांतून पुराण श्रवण करीत असत. मुलेबाळेही त्यांजबरोबर जात. कथा कीर्तने श्रद्धापूर्वक ऐकत असत. रात्री घरोघर त्या पुराणांची व कीर्तनाची चर्चा करीत. संस्कृत अगर प्रारुत पुराणे घरीही वाचीत असत. तेणेकरून नीतिशिक्षण, नीतिप्रसार अनायासे होत असे. सांप्रत आपल्यावर मुद्रणकलेची कृपा झाली आहे. यामुळे नीतिशिक्षण व नीतिप्रसार झपाट्याने वाढण्याची सोय झाली आहे. देव देते पण कर्म नेते, असा प्रकार झाला आहे. ज्ञान व नीति यांनी भरलेल्या पुराणादिक ग्रंथांची हेळसांडच नव्हे पण निंदाही ताज्या मनाच्या लेकरांच्या व चंचल मनाच्या अबलांच्या देखत होते, त्या कारणाने थोरांच्या अनुकरणाचाही दुष्परिणाम घडतो. त्यामुळे सध्यां नीतिभ्रष्ट झाल्याचा बोभाट होत आहे. शाळांतून नीतिशिक्षण पाहिजे अशी ओरड होत आहे. खरे पाहिले तर पूर्वी नीतिशिक्षण शाळेत मिळत नव्हते, आता मिळाले तरी घरच्या नीतिशिक्षणासारखा फायदा होणे शक्यच नाहीं. पूर्वीचा वर लिहिलेला सांप्रदाय पुनः सुरु होईल तर मुलांच्या नीतिभ्रष्टतेची काळजीच उत्पन्न होणार नाही. मुलांच्या अंतःकरणरूप आरशति वडलांच्या वर्तनाचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे त्यांच्या वर्तनाची मूर्ति बनते हैं, मात्र विसरता कामा नये. परत ओघ. - - सवाई शास्त्रीबुवा ( विष्णुशास्त्री चिपळणकर ) ह्यांनी समाजाचा मुहकत चाललेला ओघ आपल्या कलम बहादरीने आपल्या पवित्र मायस्वाकडे वळविल्यापासून त्यांनी लाविलेला कल्याण कल्पतरू वाढीस लागल्यामुळे समाजाचा ओघ हृल्ली स्वधर्माकडे बराच वळला आहे.प्राचीन ज्ञानमहाराविषयीं औळस वाढू लागली आहे. पूज्यबुद्वि वाढत माहे.भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, भारत, रामायण, वेद, उपनिषदें,इत्यादि अमोल ग्रंथांची मराठीत भाषांतरे झाली आहेत. वेदांतासंबंधाची अनेक पुस्तकें प्रसिद्ध होत आहेत.पुराणें व कीर्तने श्रवण करण्याची अभिरुचि वाढली आहे. ह्या गोष्टी मोठ्या मानंदाच्या आहेत. उत्पन्न