पान:भवमंथन.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७) इच्छीत असतात, मग परिवार ईच्छील ह्यांत काय नवल आहे. असळे हे कुत पण टाळणारा मृत्यु, सुखप्रद कसा नव्हे ? जीर्ण वस्त्रांतर करण्याप्रमाणे : भरण आहे, त्यात वाईट ते काय ? त्याची कल्पना येण्याबरोबर थरकांप कां । व्हावा ? या लोकाचे यथार्थ रम्य नोव कर्मभूमि हे आहे. शिवाय मृत्यूच्या कारणाने पृथ्वी आनंदमये मानण्यास शंका घेणेही योग्य नाहीच. विश्वरचनेत परमेश्वरानें कांहींच चिरंतर ठेविलें नाहीं. स्वर्गपातालादि लोकांत तरी अमरत्व कोटें आई १ अमर म्हणविणारे तेथील लोक तरी निर्भय कोठे आहेत ? पुण्यक्षय होतांच त्यासही पुनः मृत्युलोकीं आलेच पाहिजे; म्हणजे ते तेथे आपल्या पुण्याचा क्षय करीत आहेत, माणि पुनः कर्माची कमाई करण्यास या लोकीं येण्याची वाट चालत आहेत, कमाईची जागा, कर्म करून नवीन पुण्यपापांची कमाई करण्याची जागा काय ती येथेच आहे. ह्या लोकाचा अधिकार इतका माहे की, वैकुंठ, कैलास या ठिकाणी जाण्याचे रस्ते येथे आहेत. ब्रह्मी ऐक्य होण्याचा अधिकार येथेच. मनुष्य प्राणी श्रेष्ठ स्वर्गादि लोकांस मानितात, पण ते लोक म्हणजे येथील कमाई संपविण्याची स्थल होत तेथे नवें संपादन होणे नाही. म्हणूनच स्वर्गीचे अमर करिताती हेवा ।। मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥ १॥ ३ ३ ( तुकाराम, ) मनुष्यांनी वाढविलेली रमणीयता, अशी ही पृथ्वी आनंदरूप असून तिला आणखी आणखी रमणीय करण्याची मनुष्याची खटपट अनादिकालापासून एकसारखी चालली आहे. यामुळे, ‘आधीं सोन्याचे आणि त्यांत जड़ावाचे म्हणतात त्याप्रमाणे ही रमणीयता शिगेस गेली आहे. हिला ज्याच्या पराक्रमाच्या कारणाने पृथ्वी हे नांव प्राप्त झाले त्या । पृथुराजाने प्रथम हिची साफसफाई करून हिचे दोहन केले, आणि ही मनुष्याच्या कल्याणास उपयोगी पडण्याजोगी केली. तेव्हापासून आजपर्यंत मनष्य आपलें। ज्ञान, मापली करामत, आपले शरीर आणि आपले आयुष्य हिची रमणीयता आणि उपयुक्तता वाढविण्याकडे खर्च करीत आहे. लोहमार्ग, तारायंत्रे, किल्ले, कोट,