पान:भवमंथन.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५४) तो पुन्हा उघडपणी तरी जमवितां येतच नाही; चोरून मारून योग करावा, तर पापाच्या आणि दुलकिकाच्या भयास्तव ती साधनें इस्तगत होण्यास राजी होत नाहीत, तेव्हां भलत्या सलत्या मार्गाने नीच साधनें प्राप्त होतात त्यांच्या संगतीने पुन्हा विषयसेदनास सुरवात होते. त्यामुळे होणारे अनर्थ जगजाहीरच आहेत. अशा हतभाग्य लोकांस प्रापंचिकांपेक्षा इनारपट दुःख होऊन दारुग दुर्गति प्राप्त होते. सुखाच्या भ्रमानें दुःख. | निवृत्ति मागास लागलेल्याची अशी फट फजिती ! माणि प्रचात्तमार्ग तर दुःखमय तेव्हां इकडे आड तिकडे विहीर, अशी स्थिति होऊन मनास असे वाटू लागते की, हा देह तर निश्चयाने नाशवंत माहे, ह्याच्या संगतीने सुखांचा लाभ होईल म्हणून धारण करावयाचा, विचाराने पाहतां जन्म जन्मांतरीही सुखाचा लेश प्राप्त होत नाहीं । क्वचिर झाला थोडेसे सुख झाल्यासारखे वाटते, तो केवळ भ्रम होय. तान्हे लक दूध दूध म्हणून बोटे चोखिते त्याप्रमाणे दुःखाला किंवा दुःखाच्या साधनालाच सुख सुख म्हणून माणसे आनंद मानतात; तसेही नव्हे. कुत्र्याच्या तोंडात झड्क सांपडले ह्मणजे त्याला रक्त आहे असे समजून ते चघळू लागते त्यामुळे तोंडा• तून रक्त निघते; तेच रक्त चाटून ते कुतरे संतोष मानून जास्ती जास्ती चघळून आपलेच रक्त मापण खाते ! त्याप्रमाणे मनुष्याच्या भासमान सुखाचा प्रकार आहे. सुखाच्या भ्रमाने सगळा जन्म नानाविध कष्ट करण्यात जातो. सुख म्हणून जे वाटते त्यापेक्ष पुष्कळ पटीने कष्ट होतात; पण ते समजुतींत येत नाहीत. त्या कष्टसच सुख मानून वामन पंडिताच्या उक्तीप्रमाणे स्थिति होते. एका घडीच्या विषयी सुखाला ।। हेला जसा वाहतले पखाला ॥ निमीष हाले तेवभोग झाला ॥ पहा बापुडाव्यर्थहि व्यर्थ गेला॥१॥ मरण काय वाईट. अशी स्थिती माहे, तर जगून तरी काय करावयाचे आहे ? मापल्यापेक्ष । पशु पक्षी तरी सहस्रपट बरे; जन्नमरणाच्या येरझारा आणि सुखदुःखाचे वळते सुरुत दुष्प्रुताच्या संचयानुरूप होतात, असे धर्म सांगत आहेत. मापण नरदेह