पान:भवमंथन.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५२) कराव्या लागणा-या कष्टाच्या शतपट किंवा सहस्रपट सुख त्याच्या परिणामापासुन होते. निवृत्ति मार्ग कितीही खडतर असला तरी तोच साधून घेतला पाहिजे. पण तो सावल्याने तरी सुख होईलच असा काय नियम आहे, म्हणून तो साधण्याकरिता ज्यांनी संसार सोडला आहे त्यांच्या परिस्थितीचे परीक्षण करूं. संसार सोडळा तरी पोट सुटत नाही. त्याच्याकरिता खटपट केलीच पाहिजे. अच्छेर अन्नाकात घर घर फेरी करणे भाग, मग संसारात तरी दुसरे काय करावे लागत होते ! फेरीच्या इतक्याच वेळांत संसारात निक्षेपेक्षा जास्त कमाई होत होती १ तिच्या योगानें परोपकार करण्यास सवड होती. काही सुखोपभोग घडत होता. स्मात तेल गेले अणि तूपही गेलें? संसार सोडल्याने देह रक्षण सुटत नाहीं ते झटले की त्याच्यामागे वस्त्र प्राचरण पर्णकुटका झालीच. हळू हळू एका मागे एक सर्वच आले. पुन्हा घोटाळ्यांत सांपडणे प्राप्त झालें । मेला प्रपंच हातींचा लाभ नाहीं परमार्थाचा 'असे होते. परोस टाकून किमयाचुडाला राणीस न कळू देत पतीने सर्वसंग परित्याग करुन विपिनेविहार संपादिला तेव्हा मुनिवेशाने तेथे जाऊने चडाळेने त्यास विचारले की, येथे येऊन काय केलेंस १ तेथे डोक्यावर सकूट होता, येथे जटाभार आहेच, त्याचा सुश्रुषा करावी लागतच आहे; तेथे सिंहासन होते, येथे मृगासन आहेच; तेथे पक्कानें होतीं, येथे कंदमुळे, फळे मिळवावी लागतच आहेत; तेथे सेदकादिकांचा गलगलाट होता, येथे पशु पक्षी श्वापदें ह्यांचा कलकलाट आहेच; तेथ चुडाला राणी होती, येथे पशुपक्षांचे रम्य विहार पाहून आणि वनश्री पाहून मन सुप्रसन्न झाले, म्हणजे नाना प्रकारच्या विषय-विलासाचे स्मरण होतच आहे; चुडालेबरोबर केलेले विलास मनांत येऊन स्वप्नात तेच दिसून परिरंम सुख प्राप्त होऊन जागे झाल्यावर वाईट वाटतच माहे; नृपश्रेष्ठा, तेथे ऐश्वर्यांच्या योगाने अतिथिपूनन, अभ्यागत-सत्कार, अनाथ, माते, जीवदुःखविमोचन, तीर्थविहारी साधुसंत यात्रेकरू ह्यांचे पूजन, तहीतापडी ह्यसि दानधर्म, आणि गोब्राह्मण ह्याचा प्रतिपाल तरी होत होता; तुझ्या छायेखाली