पान:भवमंथन.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५० ) कुश्चळ शरीर मनुष्याला सोंदर्य किती प्रिय आहे, श्रीमंत लोक नवरी किंवा दत्तक पाहतांना किती चिकित्सा करुन सासरेच साले काढीत असतात ! पण स्वतःच्या तोंडावर देवीचे बण असतात किंवा डोळे काणे असतात त्याबद्ल कधी तरी सैद करीत बसतात काय १ ही व्यंगें तरी व्यक्तीची झाली, पण सर्वच ज्या देहास मी म्हणत आहेत त्यात एक तरी द्रव्य पवित्र सुगंधिक, स्वच्छ माणि श्लाघ्य आहे काय ? कमालीच्या घाणीचा खजिना मसळे हे शरीर कोणास तरी अप्रिय वाट’ माहे काय ? त्याच्या घाणेरडेपणाची नुसती कल्पना तरी कृर्षी येते काय ? देहच मी म्हणून त्याला नानाप्रकारे तोपित आणि भूषित करण्यांतच सर्व मायुष्य जाते माहे की नाही ? ह्या जन्मांतच स्वच्छ पवित्र आणि सुगंधिक असे दुसरे शरीर मिळविता आले असते तर ह्या घाणेरड्या अस्थिपंजराचा विटाळसुद्वा कोणी पतकरला नसता. तोच प्रकार संसाराचा आहे. नाइलाजास्तव तो मनुष्यांन पतझरिला आहे. प्राप्त झालेली संसारस्थिति कितीही लैशकारक असली तरी निरुपायास्तव तिच्यांतच मायुष्य कंठावें लागते. दुस-याची भयंकर दुःखकारक किंवा मानहानिकारक स्थिति पाहिली म्हणजे अल्पविचारी माणसे तेव्हाच म्णून जातात, की किती है। इा गृहस्थ केडगा आहे ? असा प्रसंग येतां तर आम्ही तत्काल संन्यास घेतला असता, अथवा प्राणत्याग केला असता; नाहीतर तोंडास काळे लावणाराचा तरी प्राण घेतला असता. पण ह्या गोष्टी केवळ बोलण्याच्या माहेत, प्रसंग आला नाही तपर्यंतच. तो कां येऊन पोहोंचला की वाघाची मेंडी झालीच. सालीं मान घालून मुकाट्याने असलेल्या स्थितीतच दिवस केठावे लागतात. * जातस्यच भुवो मृत्यु ध्रुवं जन्म मृतस्यच आज आपण जीव दिला तरी पुन्हा जन्मास आलेच पाहिजे. मग आत्महत्येचा दोष तरी का पद घ्या ! एका जन्मतिच जे होईल ते होऊ द्या, अशी मनाची समजूत घालून स्वस्थ बसतात. मनुष्याचा कोडगेपणा. तोंडास काळे लागो की घर बुडो, पण छापले म्हटलेल्या मनुष्याचा त्याग करवत नाही, कठीण प्रसंग पाठमोरा झाला, पुरे; की पुन्हा पूर्ववत् लाथाळ