पान:भवमंथन.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४८) रोगियाच्या सुर्वी बाबा अमृत वर्षलें। विष विष म्हणुनी त्याने थुकुनी टाकिलें । ( ज्ञानदेव. ) अशांतळा प्रकार आपण केला, असे समजून तो पश्चात्ताप पावतो. सद्गुरु मंत्री. * कल्याणकारक ज्येष्ठ पत्नीचे मापण केलेले अपराध तिनें समा रून तिचे प्रेम आपल्यावर पूर्णपणे बसावे, म्हणून निरभिमान होऊन कल्पतरूचीही उ• पमा पुरी पडत नाही, अशा सदगुरु ( मांत्रिकास ) जीव शरण जाऊन त्याच्या कृपाप्रसादाने अज्ञान व अहंकार या जादूचे निर्मूलन करविते. ते झाले कीं अविद्या परतीचा पार नाश होते. नाश तरी कशाचा अज्ञान व अहंकार यांचा नायनाट झाला की तिची ( म ) उपाधि नाहीशी हैऊन तीच मूळरूप विद्या मोठया आनंदाने जीवास माळ घालिते; आणि त्यास सुखदुःखातीत करून पुनः मूळ सच्चिदानंद रूपास पावबिते. योगसाधन. वाचकहो, सर्व घातक जादू माता सहजासहजी तुमच्या लक्षति आली आहे. ह्यास्तव सद्गुरु पंचाक्षरी मिळवून तिच्यापासून मुक्त व्हाल तर जन्माचें सार्थक होईल. पहा बुवा, जन्मांत एक वेळच आले तरी मोठे भाग्य, अशा कपिला षष्टीच्या पर्वाप्रमाणे या दुर्लभ नर्तनमध्ये आज हा योग प्राप्त झाला आहे. तो साधून जन्म साफल्य करून घ्या. नाही तर अज्ञान पशु पक्षी ह्यास ते पर्व आले काय आणि नाहीं काय, एकच. तसे होऊं देऊन भवचक्रांतच आनंदू मानून त्यातच फेरे घेत रहा. भाग २१ वा. वैराग्य खडतर. निवृत्त सुरभी मना भिववि तोषवी रासभी वृथा विषय वासना जसि शुका अही रासभी ।।