पान:भवमंथन.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४४) माता पाण्यास पीठ लावून दूध म्हणून पाजीत असत, त्यातच ती बालके मगन असत. पण खच्या दुधाची रुची त्यांच्या रसनास कळल्यावर त्यांस तें मिथ्या दुध मावडेनासे झालें. ह्यावरून ज्ञान हेच वेदनांच्या पीडेस कारण होते असे प्रकट-गुह्य नव्हे काय ? सुखदुःखाची बाधा पूर्ण ज्ञान्यास व अज्ञानास होत नाही असे पूर्वी म्हटलेही आहेच. श्रीविदेही ह्याचे उदाहरण मार्गे आलं आहे. त्यावरून ते ज्ञानसंपन्न असल्याकारणानें सुखदुःखातीत होते मर्से दिसून आलेच आहे. अज्ञानच कारण वरील विवेचनावरून सगळी मसलत गळ्यात येऊन अज्ञानामुळे वेदनांची पीडा बुद्धितत्वात होते हा सिद्धांत परत घेण्याची पाळी आल्यासारखे वाटते खरे, पण खरा प्रकार तसा नाही. तो सिद्धांत सत्यच आहे. * अनाभ्यासे विष शास्त्र'" "कुसंतानापेक्षां निसंतान व ? ह्या ह्मणीप्रमाणे हा प्रकार माहे. असावे तर उत्तम क्शावें नाही तर अपरे किंवा वाईट असण्यापेक्षा मुळी नसले फार चांगलें. अपुया ज्ञानाने अनर्थ होतात. गैर माहितगार वैद्याने ऐकीव माहितीवरून एखाद्यास औषध दिले असतां बोलाफुलास गाठ पडून एखादें वेळी गुणही येतो, परंतु षघाचा परिणाम विपरीत होऊ लागला असता औषधाच्या अंमलाचा प्रतिकार करण्याचे त्यांस ज्ञान नसते यामुळे रोग्याचा घात होतो, वाफिंची यंत्रे वगैरे चालविणारांचेही याप्रमाणेच आहे. तात्पर्य असाचें तर पूर्ण ज्ञान असावे म्हणजे सुखदुःखात्मक वेदनांची पीडा होत नाही, किंवा एक मुळीच ज्ञान नसावे म्हणजे तरी पाडी होत नाही. मुळ ज्ञानच नसलें तर त्या ठिकाणी अज्ञान ह्मणण्याचे कारणच नाही. का हा उपसर्ग ज्ञान ह्या शब्दाच्यामागे लागणारा आहे. ज्ञानालाच ठिकाण नसेल तर म उपसर्ग लावावयाचा कोणास 1 जन्म झाला तरच मरणाचा संभव. नाहीतर मरणार कोण; तद्वत् ज्याला मुळीच माहिती झणजे ज्ञान नाही त्याला पीडा होत नाही हे उघडच आहे. तस्मात् वेदनाची पीडा ज्या अज्ञानामुळे होते ह्मणून सिद्ध केले आहे. ते मुळीच माहिती नसणारे ज्ञान नव्हें. असावे एक आणि वाटावें एक. अशा प्रकारचे जे विपरीत ज्ञान त्या अज्ञानामुळे पाडा