पान:भवमंथन.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२३७ ) होत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पाच प्रकार स्थान परत्वें मानले आहेत, वस्तुतः एकच वायु आहे. वायु हे केवळ तत्व आहे, त्यास वेदनांचे ज्ञान असण्याचा मुळीच संभव नाही. तो आपल्या नैसर्गिक धमाप्रमाणे संचार करणारा आहे. मरण म्हणजे प्राण गेला म्हणतात, त्याचा अर्थ इतकाच की स्थागास्थानाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे वायूचा वास असण्याचा क्रम आहे, त्याप्रमाणे राहण्याचे त्याने स्राइलें. तसे तो सोडतो तरी शरिरांत तो मुळीं वास करीत नाही, असे नाही. त्याच्या वासाखेरीज काहीच नाही. हवेच्यारूपाने तो सर्वांस व्यापून आहे, त्याप्रमाणे मृत शरीर व्यापून असतोच; मात्र ज्याप्रकारे असावयास पाहिजे, त्याप्रकारे असत नाहीं. जीव भोगाचा अधिकारी, या दोहोंची वाट लागली; तर आता वेदनांचा मास पावणारे तत्व सांपडणार तरी कोठेआपली थोडी गैर समजूत झालेली आहे ती येथे दाखविली पाहिजे, प्राण आणि जीव ह्यांमध्ये असलेला मेद मापण लक्षात ठेवीत नाही. प्राण म्हणजे काय ते वर सांगितलेच आहे. आत जीव झणजे काय हे सांगत, केंद्रियाचे कर्तृत्व-धर्म, ज्ञानेंद्रियांचे ज्ञातृत्व-धर्म, पंचप्राण मन आणि बुद्धि अशा सत्रा कलांचा समुदाय धारण करणारे तत्व यास जीव ही संज्ञा आहे. प्राण जीवाचा अंशमात्र माहे. शरीर किंवा प्राण ह्यांजकडे भक्तृत्व नाही, त्यापेक्षां भोक्त्याचा पत्ता जिवीत कोठे तरी शोधिला पाहिजे, शरीर व प्राण ह्यांजवरोवर पंधरा कलांचा निकाल लागला; तेव्हां मन व बुद्धि है द्वये मात्र आता राहिलं. मनाचा अधिकार. यांत अत्यंत चंचल, उपव्यापी, इत्यासी मन होय. मन शुद्धीवर नसलें म्हणजे दुःख कळत नाहीं, श्रमाची का करितांना श्रन वाटू नयेत म्हणून *: भलर दादा" वगैरे गाणी काम करत म्हणतात. चाया दळतांना ओव्या म्हणतात. हे तर मनाच्या भोक्तेपणाचे प्रत्यक्ष प्रमाणच है असे वाटते. पण दुर्गंधीची पीडा होऊ नये म्हणून नाक दाबून धरणे किंवा अप्रिय शब्द ऐकू येऊ नये म्हणून कानात बोटे घालणे, त्यासारखेच शुद्ध नाहीशी करणे