पान:भवमंथन.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' (२३८) अवाचित मापण होऊन आपल्यावर येऊन कोसळलें नाहीं, किंवा कोणी माणूनही सडले नाही. आपणच त्याच्या निम्या मागास ( सुखांत ) मोठा गौरव करून नवसायांनी आमंत्रण करून मिनतवारीने माणिले. अर्थातच एका अर्धाबरोबर दुसरे अर्ध दुःख प्राप्त झाले. दुःखाचें सहचारी सुस, आणि सुखाचे सहचारी दुःख असा त्यांचा अन्योन्य माश्रय आहे. अंधास पाचारण केले तर यास वागविणाराची सोय आधी केलीच पाहिजे. जेवावयास पाहिजे, पण शिधा सामुग्री नको, असे म्हणून चालावयाचे नाही. नफा पाहिजे, पण तोटा नको असे म्हणून व्यापार होणार नाही. ज्याने लग्नच केलें नाहीं त्याला मायांविरह कधीच होत नाही. मामरणांत जाचणारा पुत्रशोचा शंकु त्याला स्वप्नति सुद्धा लागणार नाही, विरहानळास किंवा पुत्रशोकास कारण लग्नं, आणि दम तर आपले आपणच केले, तेव्हा आपल्या दुःखास कारण आपणच आहों. बाळपणचे सुख मोठ्या आनंदात असलेल्या संसारातील माणसे सुद्धा बाळपणांत गेलेले दिवस मोठ्या आनंदात गेले असे नेहमी म्हणतात. खरे ह्मटले असतां वाळपर्णी जगाचे ज्ञान नसते. सुखोपभोगाच्या वस्तूंचे आणि सुखाचें मार्मिकज्ञान कांहींच नसते. रसिकता किंवा प्रत्येक वस्तूतलि खुबी आणि खुमास मुळच माहीत नसते. “ सकल सुख सीमा सुवदना" ह्मणण्याचे मर्म गावीही नसते. ह्या सर्व गोष्टींच्या सुखाच्या अनुभवाचा भर हंगाम, तारुण्य असून परमेश्रर कृपेनें बहुतेक सुन्चे अंशतः तरी भोगण्याची अनुकूलता असतां तारुण्यातील माणसे बाळपणाच्याच सुखाचे पोवाडे कां गातात १ चाळपणी वरील गोष्टी नव्हत्या पाया, पण थोडे थोडके का होईना, जे सुख मिळत होते, ते निर्मळ अप्रतिबंध आणि अनायासे मिळत होते. तारुण्यात सुखाचा सुकाळ झाला खरा, पण त्याला असलेल्या अनेक मर्यादा कळं लागल्या, त्या सुखांचा केव्हा अंत होइल ह्यांचा भरवसा नाही, ही भांति मनात घोळू लागली, ती सुसे मिळविण्याकरितां नानाविध कष्ट करावे लागू लागले, व्यवधाने संभाळावी लागू लागली, धोरणे ठेवावी लागू लागली, दुस-याचे आर्जव करावे लागू लागले, धाक बाळगावा लागू लागली, यामुळे त सुखें विपूल खरी, तरी त्यांच्या मानाने त्यांच्या बरोबर चोरून लपून सेही असतात म्हणून निर्मळ सुख नाही. यामुळे सहचारी दुःखाचा एखादा झटका