पान:भवमंथन.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२५) जपं ढागतात. ज्या बाजारात पाहिजे तेव्हा गाड्यावारी धान्य मिळावयाचे, तैथे पैसे देऊन धान्य मिळेनासे होते. लोकांस धास्ती पडते की, 4 आपल्या पदरीं दड़ा माण से, रोज २।३ पायली धान्य लागणार; आजच धान्य मिळत नाही, अजून उमें वर्ष नवे धान्य येण्यास पाहिजे, तोपर्यंत धान्य माणदें कोठुन ! पैसा नसला तर कसेही कृरून पैदा करू, जीव गहाण ठेवं, पण पैसा. देऊन धान्य न मिळालें तर करावे तरी काय ! पैशाला चावावे की काय करावे ? धान्य मिळाले तरी शक नव्हे हजारों मिकार मोकळे सुटलेले, साऊं तरी से देईल ! पण पुढे दुकाळाच्या जाज्वल्य स्थितीत सुद्धा ही काळजी राहत नाहीं.. एकदां दुष्काल पक्का ठरला आणि व्यापा-यांनी केंवरा बांधल्या, म्हणजे गावागांव दाण्यांच्या पोत्यांच्या थड्याच्या थड्या लागून राहतात, ज्याला द्रव्यदळ त्याला कशाचा दुष्काळ १ त्याला फक्त महागाई मात्र वाटू लागते. सरकारांनी व उदार गृढ़स्थांनी पुढे हात करून दुष्काळग्रस्तास आश्रय दिला, म्हणजे गावात मजुरीलासुद्द माणसे मिळेनाशी होतात. व्यर्थ चिंता . कोणी जरा जारी झालें, की हरण काळजी. मनुष्य त्या आजारी मनुष्याच्या अंताची कल्पना करून, तसे झाले असतां असा प्रसंग येईल, तसा प्रसंग येईल, सचे नुकसान होईल, तसे नुकसान होईल, म्हणून कल्पनासृष्टि रचन एकसारखी तळमळ करू लागतो; इतक्यात ते मनुष्य सहजासहजी बरे होते. रिकाम्या काळजीने ह्याचे मात्र रक्तशोषण झाले ते परत येत नाही. विचार करून पहा, एकेका मनुष्याबद्ल असे प्रसंग किती वेळ झालेले असतात, आणि रिकाम्या काळजीने किती रक्त शोषण केलेले असते ! मरण तर एकदाच यावयाचे. ते तरी काळजी करणाराच्या देखतच येईल, असाही नेम नाही. पण ज्या मनु'प्याच्या मरणाची काळजी कोणी मनुष्य करतो, तो तें मनुष्य जन्मल्यापासून अनेक वेळा काल्पनिक मरणाचा ध्यास करून आपले रक्त काळजीला निष्कारण पानीत असतो; कदाचित् काळजी करणागच्या देखत मरण मालेच तर, त्यावेळेस होणार ते होऊन गेले, माता रडत बसून काय होणार, मलेला प्रसंग निवारिला पाहिजे; असे म्हणून तो पुढील उद्योगास लागतो. त्यावरून प्रत्यक्ष दु:खापेक्षा काळजीचे काल्पनिक दुःख किती दुर्घट आहे पहा !