पान:भवमंथन.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ २२४) दुःजानें पूर्ण व्यापिले आहे त्यापेक्षा त्याचे निवारण केल्यावांचून गति नाहीं. शत्रूचा पराजय करण्याचे मार्गास लागण्यापूर्वी त्याचे बलाबल पाहिले पाहिजेत्याच्या मुळाचा माग काढून मुळावरच कुन्हाड घातली पाहिजे. म्हणून अति सुखदुःखाच्या मूळाचा शोध लावून त्यांच्या सपाटयातून निघून जाण्याच्या तयारीस लागले पाहिजे. सुख म्ह्ण जे अनुकूल वेदना, असा साधारण समज आहे. त्याच्याच अनुरोधाने सध्या चालू. ।

  • सुखाचा व दुःखाचा वेध. सुख आणि दुःख ह्यांस आशा आणि काळजी हे दोन वेध आहेत. प्रत्यक्ष सुखप्राप्तीने जे सुख होते, त्यापेक्षां सुख प्राप्त होण्याचा पूर्ण संभव वाटला, म्हणजे जी आशा उत्पन्न होते, तिच्या मनोराज्यात जास्ती सुख वाटते. सुख प्रत्यक्ष प्राप्त झाले म्हणजे त्याचे महत्त्व वाटेनासे होने. आणि त्याच्या अनुपंगाने येणा-या अडची प्राप्त होतात. यामुळे त्या सुखापासुन पूर्वानुमाना• प्रमाणे मुख हेति नाहीं. माझी परीक्षा उतरली म्हणजे मी मामलेदार होइन, मग माझ्यापुढे शिपाई नाचतील, हाताखाली फडणिसासुद्धा कारकून राहतील, रयतेवर माझा अंमल चालेल, मी रयतेचे कल्याण करीन, तसे हित करीन, लोकांवर छाप बसवीन, असे वाटत असते. एकदा मामलेदारी मिळाली, आणि पूर्वेक गोष्टी करण्याच्च येणा-या नानाविध अडचणी दिसून आल्या, म्हणजे “ दुरुनच डोंगर साजरा " ह्या म्हणण्याचा प्रत्यय येतो; रात्रंदिवस काम करिता करितां खट्टा मोकळा होतो, तेव्ह मामलेदारांत सुख किती माहे हे कळून येते. दुःखाचाही प्रकार तसाच आहे.

। प्रत्यक्ष दुःख बरें. प्रत्यक्ष दुःख येऊन पचलेलें ब३, पण ते ते येणार असे कळून आले असतां, जी काळजा उत्पन्न होते, जे त्रास पडतो आणि जे नुकसान होते, तितकें प्रत्यक्ष दुःच्च प्राप्त झाल्याने होत नाही; दुष्काळाचे काहूर पहिल्या धडक्यास प्राप्त झाले म्हणजे सगळी जनता घाबरून जाते, ज्यांच्याजवळ खंडगणता गल्ला असतो ते, आणि ज्यांच्याजवळ उद्याँचाही शिधा नसतो ते, असे सगळेच दाणादाण करू लागतात. * पगडी बेचकर राखो धान ' हाच मंत्र सगळे