पान:भवमंथन.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२१ ) वाटतो. साधने हीच रुरुतदर्शनी दिसून येतात ह्यामुळे साध्यापर्यंत नजर पोहॉचत नाही. अर्थात साधनास मालक मानिलें जाते पाटलापासून स्टेट सेक्रे: टरीपर्यंत राजसेवक यांस साक्षात् संबंधामुळे गरीब रयत सरकार, धनि, (राजे . साहेवही म्हणते, त्याप्रमाणे : संसारांतील पंच विषय, मायाजाल, (धनवैभव, सत्ता इत्यादिकांचा जीवाशी साक्षांत निकटसंबंध असतो म्हणून अज्ञान माणसे त्याळाच साध्य मानितात. व त्यांच्याच आराधनेत जन्म घालवितात व जन्ममरणाच्या रहाटगाडयांत फेरे घेतात. मातापितरे, धनि, गुरू, पति, राजा इत्यादिक यांस देव मानण्यास नीति शास्त्र सांगतात. उपासक आपल्या उपास्य देवतसि ईश्वर समजतात. मताभिमानाने एकमेकांचा द्वेषही कारतात, वादविवाद वाढवितात, सर्वं धर्भ पथ अशाच मागाने से स्थापित झाले आहेत. पण हे सर्व विपयाँस होत. बहुतेक धर्मपंथ परमेश्वराच्या प्रति निधीचेच उपासक आहेत. यामुळे प्रतिनिधीचा हुकूम मानून त्यांच्याशी राज नष्ट राहिले असतां राजाशी राजाने राहणे सहजच होते. च राजाचा हुकूम शिरसावंद्य केल्याचे श्रेय येते. त्याप्रमाणेच म्हसोचा यिरोवापासून ज्ञान राजाच्या ब्रह्मापर्यंत कोणच्याही देवतेची मावभक्तीपूर्वक उपासना केली तरी तिने परमेश्वर संतुष्ट होतो. तात्पर्य, संसार हा विपर्यास होय. सरे साध्य मोक्ष अथवा परमे. वर् प्राप्ति होय. साधनाला भुलून साध्याचा विसर पडणे हा मानवी स्वभावांत दोष असल्या कारणाने साध्य जे परब्रम्ह त्यास विसरून बहुतेक माणसे संसारात गटांगळ्या सात माहेत. हा पर्वतप्राय विपर्यास सवन ओळखून सावध रहवें माणि ख-या साध्याची ओळख करून घेऊन त्याची रुपा संपादन करावी. मिथ्या सुखदुःखें कोठून आली, त्यांचा भास कोणास होतो, वैराग्य खडतर आहे म्हणून सर्वसंग कायम ठेवून निस्संग कसे रहावे, संसार करीत असतांसे निजानंदांत राहून तरून असे जावे, ह्याचा विचार पुढल्या संडांत केला आहे.