पान:भवमंथन.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१८) विध्वंस होत आहे. शेंडा नव्वद कार्ये ऋणोत्पादक असतात. संसारामध्ये ऋणाचा प्रवेश घरास मग्नि स्पर्श होण्याइतका घातक असतही सर्व शहाणी सुर्ती माणसे कार्य करण्यास निघाली म्हणजे बेफाम होऊन सर्व कापायाचा पायच असे कनं मोठ्या आनंदाने व समारंभाने घरांत आणितात. मानपान, नूतन व्याही विहिणी ह्यांनी एकमेकांचा आदरसत्कार करावा हे विहितच आहे. त्यास अनुसरून लग्नत मानपानाची योजना झाली. पण ते मानपान म्हणजे एक बाबच होऊन बसली आहे. मनःपूर्वक मान देण्याचे लोपून मानपानाच्या हक्काचा कडाक्याचा वाद होतो. त्यात उसाच्या पाखाळ्या निघून कधी कधी मोठे सटे होतात. दुराग्रही सोय-यांची गाठ पडली असतां आजन्म अबोलेही पडतात. विहिणीविहिणींचा कडाक्याचा तंटा चालू असतो, स्वस्वभावास अनुसरून अश्रुपात चालू असतात, व अशा मंगलकारक थाटात मानपान देण्याघेण्याचा संस्कारही होत असतो. जी माणसे मोठ्या दराने व अगत्या. में बोलविले असतही दुस-याच्या घरी जेवणात येण्याचे ठीण, ती माणसे व्यायापाशी जेवणाची व पागोट्याची खंडणी मागून जळफळत माखुषीने दिलेले जेवण उकळीत असतात. असे विपर्यासाचे प्रकार कार्यात पुष्कळ होऊन झानंदाकरिता केलेल्या मंगलकार्यात तंटे बखेडे व रडारडी होते. कथा पुराणे. समाजामध्ये भक्तिज्ञानवैराग्यादिकांचा प्रसार होऊन समाजाची प्रवृत्ति हरिभजनाकडे व्हावी, आणि, त्या योगाने लोक तरून जावेत म्हणून कथा पुराणे ह्याची योजना असता कथेमध्ये हरदास आपली विद्वत्ता प्रदर्शित करण्याकरितां चं पु; अंतरळापिका; बहिलपिका, कुठे कोट्या इत्यादिकांची रेलचेल करून देतात. आपली विद्वत्ता कळण्यासारखे कांही तर गृहस्थ श्रोतृसमाजात आहेत की नाहीत, ह्यांचा तर मुळीच विचार करीत नाहीत. त्यांच्या कंठेशोषापासून त्यांच्या अंतःकरणावर लड़मात्रही संस्कार घडत नाही. विद्वत्ता वेताचीच असून भाव मात्र मोठा घालणारा हरदास मसला म्हणजे तर ।