पान:भवमंथन.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१६) च्या डामडौली वर्तनामुळे, कोणाच्या तरी दुईतनामुळे व अनत अन्य कारणे उत्पन्न होऊन कधी कधी नव-याला भीक नको पण कुतरा मावर 'असे म्हणण्याचा प्रसंग येतो. कोठून लग्न केले आणि सुखाचा जीव दुःखात घातला असे वाटते. अत्यंत हितकर सुखकर व आनंदप्रद असा दांपत्यसंबंध सर्वप्रकारी तापपद होतो. विद्याचार संपन्न म्हणून मिरविणा-या देशातून सांप्रत हा वैवाहिक संबंध अथत दुःसह होऊ लागला आहे. विवाहितापेक्षा अविवाहिताचे प्रमाण वाढले आहे. * अति सर्वत्र वर्जयेत ” ह्याप्रमाणे सुधारणेच्या व स्वातंञ्जाच्या अतिरेकाचा परिणाम सुधारणेला रानटी स्थितीचे व स्वातंत्र्याला बेबंदीचे स्वरूप प्राप्त करून देणारा झाला आहे. आपला जन्म केवळ आपल्या सुखाकरिता आहे. * परोपकाराय इदं शरीरं " हे म्हणणे मूर्खपणाचे ठरः ल्यासार झाले आहे. स्वतःच्या सखाकरितां व वैभवाझरित अनाथांची घरे दारे, देरी सुद्धा लुटणे हा मोठा पराक्रम, इँच जन्माचे सार्थक मानले जात आहे. पण ह्याचे नवल किंवा खेद वाटावयास नका. अनादि कालापासून दांपत्य. संबंधानें नवरा नवरी म्हणजे एकाच शरीराची दोन अर्धे अशी असलेली समजूत अस्तात चालली आहे. परस्परांचे प्रेमबंधन शत्रूच्या शेवळाप्रमाणे वाटू लागले आहे. अर्धांगी गळ्यांत घोरपड बांधल्या सारखी वाटू लागली आहे, रानटी स्थितीपेक्षा भयंकर. नवरा बायको हे नाते मोडून रतिसुखार्थ ज्यावेळेस जो पुरुव अथवा स्त्री मिळेल तिचा योग करावा. वाटेल तोपर्यंत दोस्ती चालवावी, आणि त्याला किंवा दिला सोडून त्यांच्या जागी दुस-यांची योजना करावा, या प्रकार सरु झाला आहे. शिखरावर गेलेला मनुष३ पुढे जाण्यास मार्ग उरला नसल्या कारणान पुन्हा तळ येतो, त्याप्रमाणेच वन्य स्थितिपासून वर चढतां चढतई सघारणेच्या शिजवर पोहोचलेला दांपत्यसंबंध पुन्। वन्यस्थिवावर आला आहे, पशु, पक्षी आणि अशी माणसें ह्यांत काय अंतर आहे ? वन्या पलीकडे पशु, पक्षी संतति समर्थ झाल्यावर तरी ओळख विसरतात. गर्भधारणापासून संतति स्वसंरक्षणपटु होईपयत तरी तिचे संरक्षण माद्या मानवाप्रमाणेच मोठ्या