पान:भवमंथन.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३१४) थर पाणी सोडण्यास मनुष्ये तयार होऊन अहोरात्र द्रव्याकरिता सक्तमजुरी मोठ्या आनंदाने व अभिमानाने करीत आहेत. त्या मेहनतीचे श्रम म्हणजे सुखानि त्यांच्या मनातसुद्धा येत नाही. परलोकीं यमदेढ घडेल या कल्पनेच जन्न कोठून होणार. पुढल्याजन्म पापाचे प्रायाश्चत्त भोगल्यावाचून सुटका. नाहीं हे कसे कळणार १ द्रव्यलोभाचा अतिरेक झाला म्हणजे कार्पण्य उत्पन्न होते, पण मनुष्य साधनाच्या साधनास साध्यापेक्षा म्हणजे सुखापेक्षा जास्त मानित. * माडका वेचिता जाय प्राण अशी त्याची अवस्था होते. देवार्चना, संतसेवा, अन्नसत्रे, परोपकार, लोकसेवा, सरकीर्ति, दानधर्म इत्यादि अनंत सत्रयांचे संपादण्याचे साधन द्रव्य आहे हे वर्म जाणून जे त्याची यथार्थ योजना करितात त्यांस वरील अनंत साध्ये साधून त्यांच्या जन्माचे सार्थक होते. साधन समजले तरी सध्याची योजना ज्याची गैरशिस्त होते त्यांची सहजच दुर्दशा होते. द्रव्यास प्रति-साधन न समजता साध्यच जे समजतात ते सुखास स्वार्थास व परमार्थास मुकतात. द्रव्य सधैं नये एवढे मात्र त्य'चे ब्रीद असते. हजारों रुपये खर्च करून वडिलांनी बांधलेल्या इमारती शेक।रावांचन व किरकोळ डाग डुजीवांचून नाश पावू लागल्या तरी ते तो खर्च करण्यास नाराजी असतात. प्रत्यक्ष प्राणावर बेतली असून ऐपत असतोही वैद्यास पैसे द्यावे लागतील म्हणून औषध घेत नाहींत. मोठ्या ना खुशीनें नाइलाज होऊन अगदी शेवटची वेळ आल्यावर षध घेऊन चांगला गुण आला तरी रोगाची राहिलेली सर निःशेष करण्याकरिता पुढे औषध घेण्याचे खर्चाच्या भीतीने सोडून शेवटी प्राणास मुकृतात. तात्पर्य साध्य आणि साधन ह्यांचा विपर्यास झाल्यामुळे असे अनर्थ इमेशा होतात. कामिनी. कनकाचा प्रकार वर लिहिला तसाच कामनांचा आहे. संसार यात्रा सुखाने व्हावी, संसाराची घरांतील व बाहेरील कामे सुरळीत चालण्याकरितां त्यांची वाटणी योग्य योजनेने व्हावी, परस्परांची कळकळ व प्रेम उत्तम प्रकारचे हित संबंध एक असल्यामुळ रहावे, दुखणी बाहाणी व नानाप्रकारच्या आणखी पत्ती ह्यामध्ये सेवा, चाकरी, जपणूक, दालदिलासा एकमेकसि एकमेकांनी