पान:भवमंथन.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

17F ( ११ ) येऊन त्याची लीला चालू झाली. मूतमूर्त अखिल वस्तूंमध्ये हे चैतन्य वास करून सर्व काही नियंत्रितपणाने चालवीत आहे. ह्या चैतन्यासच गुणधर्म म्हणतात. जड चाधांचा नेचर (निसर्ग )तेच चैतन्य होय. आता, चैतन्य रूपी गुणधर्माचा संबंध निर्विकार ब्रह्माशी कसा आहे आणि सृष्टीशी व विश्वाशी कसा आहे, प्रत्येक वस्तूशीच काय पण परमाणूपाशी कसा आहे, ह्याचे विवेचन करण्याचे स्थल हे नव्हे, म्हणून आपल्या विषयापुरते इतकेच विवेचन पुरे आहे. F 55 Fण आनंदमय पृथ्वी र म नि । - 1 = = हवा, पाणी, भूमि आणि वीज ह्या कारणांपासून उद्भव पाणाच्या वनस्पतीमध्ये त्या सर्व कारणांचे अंश वास करतात. जननीजनक ह्यांच्या शरीराचे वर्ण, सुदृढपणा किंवा रोग आणि स्वभाव ही संततीमध्यें अंशमात्र उत्पन्न होतात. कवइशामध्ये रवितेज आणि उष्णता असते, हे अनुभवसिद्ध आहे;त्यापेक्षा सच्चिदानंद परबझापाबून त्याचा अंश चैतन्य ह्याने युक्त जी सृष्टि निर्माण झाली, तिनमध्ये सत म्हणजे अनाद्यतता, चितु म्हणजे ज्ञान व अनंद ह्याचा वास असलाच पाहिजे. पुढे सृष्टि क्षणभंगुर असल्याचे प्रतिपादन केले आहे, ते तिच्या लयाच्या संबंधाने आहे. प्रळयकाळी तिचा लय होतो. लय म्हणजे संपूर्ण नाश नव्हे. गोगलगाय ज्याप्रमाणे आपले अंग आकुंचित करिते किंवा कांसव आपली मान अति घेते, त्याप्रमाणे प्रळयकाळी पृथ्वी आपल्या बीजरूपी प्रविष्ट होऊन परमात्म्याच्या उदरीं लीन होते, आणि पुनः पूर्ववत् प्रकट होते, असा तिचा क्रम चाललेला आहे. भूतीं छाया ज्याप्रमाणे जन्मापासूनच आहे, त्याप्रमाणे ब्रह्म माया आहे. म्हणजे ब्रह्माप्रमाणेच सन आहे; चित् म्हणजे चैतन्य तिजमध्यें वास करीत आहे; आणि ती केवळ आनंदरूप आहे. मुळी आनंदासाठींच सृष्टि बह्मापासून उत्पन्न झाली आहे. बह्म एक आणि अद्वितीय असतां क्रीडा करण्याच्या इच्छेने त्यास बहुभवेच्छा झाली. तेव्हा प्रति उत्पन्न होऊन तिच्या द्वारे पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे सृष्टि निर्माण झाली. तस्मात् ती आनंदमयच असली पाहिजे हे स्पष्टाहून स्पष्ट आहे. सृष्टि व तिचे पति चैतन्य–विष्णुः ह्या मातापितरांस प्राणिमात्राची