पान:भवमंथन.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०) चन सर्पाचा भास व्हावयाचाच नाही. मिथ्या विश्वाचा भास काही तरी सत्य वस्तु असल्यावांचून व्हावयाचाच नाहीं हे सिद्धच आहे. आधाराचा थांग. विश्वाला कांही सन्या वस्तूचा आधार असलाच पाहिजे हे सिद्ध झाले. त्यापेक्षा आता त्या आधाराचा थांग लावण्याचा यत्न करु, सगळ्या विश्वाशी आपल्यास काय करावयाचे आहे ? मापल्यास आधार देणा-या भूमंडळाचाच आपण विचार करू म्ह्णजे झाले. सगळ्या पृथ्वीवरील पदार्थाच्यां प्राणी, उद्भिज्ज आणि खनिज ह्या तीन कोटी मानिल्या आहेत. सूक्ष्म विचार केला म्हणजे ह्या तिन्ही कोटीतील वस्तुमात्र एकाच द्रव्याने बनलेले आहे. जेवढे म्हणून मूर्त आहे ते सर्व पृथ्वीच्या अंशाने बनले आहे. त्यांत मोठा भाग पृथ्वीचा आहे. शिवाय अपू, तेज, वायु, आणि आकाश हीं त वस्तुमात्रांत न्यूनाधिक प्रमाणाने आहेत. सर्व सृष्टि पंचमहाभूतात्मक आहे. पंचमहाभूते छापल्याला निरनिराळी स्वतंत्र जरी वाटतात, तरी ती भिन्न नसून एकाच तत्वापासुन वंशसरणीने झालेली आहेत. चारी भूनन अापल्यांत वागविणारे आकाश सर्वांचे मूळ आहे. ह्याच्यापासून वायु उत्पन्न झाला. त्या वायूपासून अग्नि आणि अग्नीपासुन अप् व अपापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीपासून वर सांगितलेल्या तीन कोटि उत्पन्न झाल्या, 13355 F1 SEPTE वर लिहिल्याप्रमाणे पंचमहाभूने झाली, तरी त्यांच्या लीला सुरू होण्यास सत्व, इज व तम ह्या तीन गुणांचे मिश्रण व्हावे लागले. हे आठ प्रकार निरनिराळे सांगितले तरी हे सर्व प्ररुतीचे गुण आहेत, म्हणजे सर्व पसारा हा प्रकृतीचा आहे. प्र=विशेष+कृति-करामत=विशेष करामत. तस्मातू ती स्वतंत्र नव्हे कोयाची तरी असली पाहिजे म्हणजे ह्या प्रकृतचि सद् नियमन करण्यास नियंता पाहिनेच आहे. तो नसेल तर कांहींच व्हावयाचें नाहीं. हीं नुसती ब्रह्मांडे निर्माण करिते; पण पुढील खेळ करणारा नसता, तर ती अस्ताव्यस्त आणि अचेतनच राहती. ह्या ब्रह्मांडामध्ये आणि प्रतीमध्ये ब्रह्म किंवा परमात्मा याचा अंश प्रकट होतांच विश्व उदयासः