पान:भवमंथन.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९९) कमसल संतात. घुशीप्रमाणें घर पोखरून नांवालौकिकावर पाणी ओतून उभय कुलस छलक लावून तोंड काळे करून घेऊन हीन जातींतील जाराबरोबर निघून गेलेल्या बायकोची मुले ह्यांजवर ममता करण्याचे काही तरी कारण आहे काय ? ती मुलें नव-याची कशी म्हणावी, पण त्या मुलावर आपलेपणा मानल्यामुळे त्यांच्यावर ममता बाप करितोच, त्याला आई नाही म्हणून ज्यास्ताच जपतो. ह्याहीपेक्षां चमत्कार की, ती माकाचाई पुन्हा आली तर नवरा तिला परत घेऊन प्रथम काही दिवस मोलकरणीप्रमाणे, निराळी ठेवितो, पण हळू हळू सर्व जुळते ही केवढी देखत भूल आहे. तृतीय प्रकृतीच्या गळ्यात बायकोचे लोढणे पडलें, म्हणजे तोही तिजवर आपलेपणा मानून तिच्या व तिच्या कमसल परिवाराच्या मरणाकारता इतर पुरुषाप्रमाणे संसाराचा घाणा आमरण मिरवीत असतो. आख्यायिका. ह्या आपलेपणाच्या महात्म्याची एक विलक्षण माख्यायिका आहे. ती सत्य असो वा नसो, पण तिच्यापासून आपलेपणाचा महिमा चौगला कळून येतो. एका सपने दंश करून एका कुळांतील पुष्कळ माणसे पुष्कळ वर्षांत मारिला, तो साप त्या घरातील माणसांस नेहमी दिसे. एके दिवशी एका मुलास तो साप दिसला, तेव्हां ते मूल मयमीत होऊन आपला साप आला असे म्हणाले, तें ऐ. कताच तो साप प्रसन्न झाला. असा मापलेपणाचा चमत्कार आहे. जें राष्ट्र माप लेपणाला जपते ते सर्व सुखें मागते आणि जे राष्ट्र आपसति विरोध वाढविते त्याचा परिणाम काय होतो हे जगास मूर्तिमंत पाहण्यास सांपडावे म्हणून की काय सर्वांपेक्षां वडील व बुद्धिमान मायराष्ट्र हल्लीच्या अवस्थेत परमेश्वराने ठेविलें आहे: | घराची हौस. ह्या मदमिकेच्या पायी थोरांच्या हातून मोठमोठ्या चुका होऊन अनर्थ होतात. घरास पडणारे भाडे आणि घरास लागणाच्या खर्चाचे व्याज, ह्यामध्ये