पान:भवमंथन.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८७) र दे, शरिराला सुख होऊन तत्द्वारे मनाला आनंद व्हावा म्हणून विषयाचे सेवन मनुष्ये करितात असे सरुत दर्शनी वाटते, पण त्या हेतुशिवाय, दुम हा एक हेतु विषय सेवनांत असतो. दंभाचा नाद स्तुतीसाठी लागतो, स्तवन हे विष आहे. पण फार मधुर वाटते. स्तवनासारसा कैफ कशानेही येत नाही. स्तुतीने कोण म्हणून पाघळत नाही. स्तुति आवडत नसल्याचा बाणा बाळगणारास तु म्हास स्तुति आवडत नाही इतके म्हटल्याने तोही पाघळतो. माणसांचा काय माइ १ मगवान सुद्धा स्तुतिस्तोत्रप्रिय आहेत. सुख इतरांस. नाटकपात्रे, मल्ल सर्कसवाले आपापली कामें करितात, तेव्हा त्यसि पुष्कळ कष्ट होतात व काळज़ी बाळगावी लागते. त्यांच्या कलापासून सुख प्रेक्षकांस होते. प्रशंसेकरिता ही माणसे रावत असतात. मंगलका, उत्साह आराशी बगैरे करणारे ह्यांचाही प्रकार तसाच. कार्याचा खर्च, तो करण्यास झालेले कर्ज, ती कामें करण्यास लागलेली मेहनत, दारूच्या धुराचे भपकारे, व्य स्थेत झालेल्या चुकांचे परिणाम, त्यापासून होणारा दुकिक व अनेक त्रास ह्यांचे मात्र धनी ती कामे करणारे होत. मिष्टान्न, हारतुरे, गजरे, आत्तरगुलाब, बस्नेभूषणे, इत्यादिकांचा लाम शेकडो बाहेरच्या माणसास होतो. यजमानास संध्याकाळपर्यंत दगदग होते, पाणी पाणी होऊन कांहीं नकोसे होते. रात्री थंडसा भात व पिठले मात्र त्याच्या वाटणीस येते, घसा बसतो. कायमंत मागवटा येऊन कदाचित दुखणे येते. हे सर्व केवळ फुशारकी कारता मोठ्या आनंदाने परकारतात. आपल्या समाजाच्या मागे ज्या अनेक घातक रुढी व संवयी लागल्या आहेत त्यामध्ये कार्याचा आलीजाई खर्च हा प्रमुख होय. हा केवळ फुशारकीकरिता, श्रीमंत नसतां श्रीमंत म्हणून घेण्याकरिता म्हणजे दुमकरितो आहे, ह्याच्या योगाने समाजाची दुर्दशा सतत होत आहे. कर्जाच्या कहराने कुटुंबेची कुटुंबें कंगाल होत आहेत. तथापि समाजाचे डोळे उघडत नाहीत. पराक्रमी भाग्यशाली पूर्वज सर्च करीत नसत इतका खर्च आपण पायदळी पडून बंदिवासात दिवस काढीत असतां करीत अाहों.