पान:भवमंथन.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मादावाड़ानळ मडकण्यास दम व अहंकार है घृतकलश. इसे कारण होतात, मिथ्याभवाचा नाद सवयीमुळे कसा लागतो, भव सुखप्रद व्हावा तौ योजनेत चूक होऊन दुःखप्रद को होतो आणि साध्य सोडून साधनाच्या नादी गगल्यामुळे सगळाच विपर्यास कसा होतो हे पुढल्या खंडांत वर्णिले आहे. चतुर्थ खंड-भव दुर्विपाक कारण. 4- 23 --- भाग १५ वा. आगीवर तेल, चांचल्या थकवी मनोकपि तया आशातुरा खेळवी ॥ चावे मछर विंचु तो विषय हीं भूते सदा मेळवी ॥ मोहाहकृति-दंभ जादु करिती वेडा तयाच्या लिला ॥ वर्णाया असमर्थ मी म्हणुनिया अल्पांश तो वर्णिला ॥ रत्नदीप्ति, ज्वाळा,लहरी इत्यादि ज्याप्रमाणे वरच्यावर वरखाली किंवा मागे पुढे होतात त्याप्रमाणे चळवळ करणारे, चक्राप्रमाणे सदी भ्रमण करणारे, अत्यंत उपद्व्यापी आणि अनिवार् हे मनोमर्कट आहे. हे वासना मदिरेनें अगदी तर झाले आहे. मच्छर वृश्चिक त्याला सर्वकाळ दंश करीत आहेत. विषय पिशाचे त्यांच्या बोकांडी बसली आहेत. दम, महंकार आणि मोह ह्या जादून त्यस घेरले आहे. तस्मात् ह्याच्या चेष्टांचे पूर्ण वर्णन करण्यास कोण समर्थ आहे. विषय व मोह ह्यांचे वर्णन मी अल्पमतीप्रमाणे पूर्वी केलेच आहे. आता दम व अहंकार ह्या जादून होणा-या परिमाणांचे वर्णन करितो.