पान:भवमंथन.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८१ ) सर्वस सारखे सुख. : विचाराने पाहिले असता परमेश्वराने सख सवास सारखेच ठेविले आहे. गायनाने मनाचा, स्पर्शाने त्वचेचा, रसाने रसनेचा, रुपाने नेत्राचा आणि गंधानें नाकाचा संतोष व्हावयाचाच. श्रीमान माणि गरीयगुरीब ह्याचा भेद ह्या ठिकाणी मुळीच नाहीं. इंद्रियांना विषयांचे सुख सहजगत्या परिस्थितीनुरूप प्राप्त होतेच, व ते प्राप्त झालें कीं संतोष होतोच. हा संतोष कांहीं विषयांच्या प्रमाणावर लहान मोठा होत नाही. विषय मग तो कितीही लहान असो तो प्राप्त होताच इंद्रियांस संतोष होता. मासामर कस्तुरीचा वास घेतल्याने मासाभर संतोष आणि शेरभर कस्तुरीचा वास घेतल्याने शरभर संतोष, असा काही प्रकार नाही. परिमितापेक्षा जास्त विषय प्राप्त झाल्याने उलट त्रास मात्र होऊन सुखाचा भंग होतो. फार साखर साल्याने मिठी बसते. फार मीठ झाले तर सारट होत होतां कडू होते. फार सुगंध झाला तर, दोक्यांत भरून त्रास होतो. सुख सर्वीस सारखेच.. प्रत्यक्ष देवेंद्र आणि सुकर ह्यांच्या सुखदुःसांत काहीच अंतर नाही हे शिरोलेसावरून कळतच आहे. मेपासून होणा-या रतिसुखाचा इंद्राचा संतोष आणि शूकरीपासून, शुकरास हो* आरा संतोष ह्यांत काय मंतर आहे. अमृतपानापासून देवेंद्रास होणारी तृप्ति -णि डुकरास त्याच्या घाणे-या अन्नापासून होणारी तृप्ति यति काय फरक आहे. मरणाचा ताप डुकरास आहे, तोच धाड़ स्थानभ्रष्टतेचा सुरेंद्रास नाही काय १ तात्पर्य तत्वतः सर्वांस सारखेच सुख आहे. पण तेही असत्यच बळेच मानून जग त्याच्या नादाने गुंग झाले आहे. तत्वतः ते सत्य नसून केवळ भासमान माई हे मागें सिद्ध झालेच आहे. कुपथ्याचे पदार्थ माण केल्याने अंगास कंडू सुटून हात साजवावेसे वाटले म्हणजे वाजवितांना सुख वाटते, पण ते पुढे सरूज उत्पन्न करुन दुःख मात्र देण्याचे बीज असते. त्याप्रमाणे अज्ञान आणि वासना यांच्या कुपथ्यामुळे मनास मोगेच्छारूप कंडू उत्पन्न होऊन पंचज्ञानद्रियांचा लोभ होतो आणि माजविण्याप्रमाणे व्यापार होऊन पंचविषयांचा मडिमार झाला म्हणजे स्वर्गसुख सुद्धा तुच्छ वाटू लागते. पण दुःखागारांचे काहूर माले म्हणजे सरजल्या माणसाप्रमाणें जिकडे तिकडे तिर स्कार, दुर्दशा आणि वेदनांचा सुकाळ होतो,