पान:भवमंथन.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० ) अंश मात्र पोटात जातो, त्यामुळे आपल्यास बळाचा लाम होत नाही. हिरवा हुरडा खाणान्यास मानवतो तितका भाजलेला मानवत नाही. थंड पाणी पि• मारास बल असते तसे तापवून पिणारास असत नाहीं. साय काढून दूध सेवन केळे तर नुसत्या दुधाइतके शक्तिदायक होत नाही. मापल्यास अनादि कालापासून ही संवय झाल्याकारणाने आपला कोठा केवळ अशक्त बनून गेला आहे, व उत्तरोत्तर अशक्तता वाटत आहे, त्यामुळे निर्जीव केलेले पदार्थ सुद्ध दिवसानुदिवस सौसेनातसे झाले आहेत ! आयुष्य कमी होत चालले आहे. नैसर्गिक पदार्थ व गोष्टी नेहर्मी त्रिमापेक्षा श्रेष्ठतर असतात. पण मनुष्य आपल्या अकलेच्या तोन्यति तें न समजून वेड्या समजुतीने नानातरेचे कृत्रिम प्रकार वाढवून पंचविषयांच्या मोगाच्या अनंत पन्याकारत पडून सापळे सर्वस्वी नुकसान आणि घात करून घेत आहे. गावातील पशुपणी आणि रानांतील त्याच जातीचे प्राणी पहावे म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम ह्यांमधील अंतर दिसेल. खेड्यापाड्यातील लोक नागरिकांपेक्षां धडधाकड व दीर्घायुषी असतात, निद्रासुख कोणास जास्त. रंगमहाल, गुडघ्या इतका बिछाना, छपरपलंग, वाळ्याचे पडदे, पैसे, गायक वगैरे खटाटोप जमतील तेव्हा जागीरदार साहेबांस झोप येणार, झोंप कोठली थोडा डोळा लागणार. बिछान्याला एखादी सुरकुती पडलेली असली की बिघइली झोप, फुकाचे खाऊन सगळा दिवस, लोळत पडणार, मग झोंप कोठून येणार 1 इकडे बळीराजा मऊ करून म्हणजे सगळा दिवस सपाट्न श्रम करुन माकाशाच्या पांघरुणाखाली धरणीच्या मृदु शय्येवर गाढ झोप घेते. व्याप तिता संताप. या न्यायाने जागीरदाराच्यामागे अनेक व्याप असतात, यामुळे त्याला अनेक काळज्या व विवंचना असतात, ह्यामुळे त्याला इतकी साधनसमृद्धि असूनही सुखाची झोप येत नाही. बळीराजा धरत्री मातेची सेवा करणार, ती प्रसाद देईल तो खाणार आणि होईल ते होईल म्हः णून आनंदात राहणार