पान:भवमंथन.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७०) शतकोटी रामायण रचिलें. न्याय ( सत्य ) ह्या वीजावर न्यायशास्त्राचे गाड्यापारी ग्रंथ प्रत्येक राष्ट्रति असून इरमाच्या दरमहा किंवा दररोज ह्यांत मर पडतच आहे. न्यायाच्या ग्रंथात कही धडधडीत अन्याय घुसडला गेला आहे. मुदतीचा ायदा म्हणजे धादति अन्याय नव्हे काय एका घटपूर्वी हक्क अंम: लांत घेण्याजोगा होता; पण त्यावरुन एक घटका गेली म्हणून झाला बातल ! अन्नावरुन ग्रहण गेले, म्हणून अन्न अग्राह्य. तद्वतच, विषयसेवनाच्या लालसेनें विषयाचे एकमेकांशी मिश्रण करून त्यात सहाव्या इंद्रियाच्या कल्पनांची आणखी भर घालून जीव सृष्टीने; हे जग विषयांनी भरून काढले आहे! सगळा जन्म ह्या विषयांच्या भोव-यात जाऊन चिंधड्या उडून जात आहेत! खोटे असतां सरें मानलेले विषयसुख या पर्यायांच्या पर्वतासाली कोठे चिरडून जाते त्याचा पत्ताही लागत नाही. सुख सुख म्हणून नसतें दुःख मात्र न कळत पदरी पडते. मिजाशीचा परिणाम वर लिहिलेली विधाने ठसण्याकरिता स्पर्श व एससुखाचा मासला पहा. स्वचस गरम गरम प्रिय आहे खरे; पण मनुष्यदेह बसून राहण्यास निर्माण केलेला नसून प्रवृत्ति व निवृत्ति मार्गातील अनेक सत्कृत्ये करण्याकरिता निर्माण केला माहे. * मर्दनं-गुणवर्धनं हा गुण त्यांत ठेवला आहे. जितके जितके श्रम पडतील, तितका तितका माग्ने प्रदिप्त होतो. तितकें तितकें खाणे. पिणे जास्त होते, ते ज्या मानाने जास्त त्या मानाने शरीरति बल, तेज, उत्साह आणि पराक्रम जास्त होतो. जितके हाल आणि अपेष्टा, तितका कंटकपणा वाढून दुखणी वहाणी दूर पळतात. मोठमोठी श्रमसाहसाच कामें करण्याचे आणि संकटें | धोके घेर्याने सोसण्याचे मनाला सामथ्र्य येते. अन्यपक्षी मिजास वाढेल तितके मनुष्य नाजूक म्हणजे अशक्त होते. भोगशक्ति व पचनशक्ति क्षीण होते. साणेपिणे कमी पडत जाऊन थोडे होते, तेही पचत नाही. एका लवंगेने उष्ण आणि एका वेलदोड्याने थंडी होते। कमकुवत होऊन मन अगदी दुर्बळ होते. असल्या फुसक्या शरीरात तेज, बल १३