पान:भवमंथन.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७५ ) लहानपणापासून सगळ उद्योगी, कटाक्ष, धट्टीइटी, सवैपसा सुसाची गोष्ट ही की सगळी अल्प संतोषी, राज्य कोणी करो, कोणी राज्यावर धाड़ घालो, त्याच्याविषयी बेफिकीर. मुसलमान गेले, मराठे आले. ते गेले, इंग्रज अाले. शनवारचा पाडा गेला, नानाचा वाडा गेला, सगळ्या हिंदुस्थानवर सत्ता करणा-या मटवंशास उभे राहण्यास जागा नाहीं. पण बळी राजाचे घर निर्भय, राज्य निर्भय. जमिनीची संडणी फेकून दिली म्हणजे झालें. बळीराजासारखें कुटुंबसख कोणासच नाहीं. मुळे लहानपणापासून स्वतंत्र स्वगृहीं दूध पिऊन तालीम करून निकोप फोफावलेली. नाहीतर पढिरपेशांची मुले शाळा, घोङ, पट्टी परीक्षासत्रे ह्या मधून पिळून निघून निःपाण झालेली. माईबाप असत त बळी राजाच्या मुलांस सजीवास दग्ध करणारी काळजी शिदतसुद्धा नाहीं. ताजे पदार्थ, शुद्ध हवा, साधी रुची, संतोषपूर्ण साधी वागणूक म्माणि निर्मळ भाविक व समाधान परिपूर्ण मन ह्या नैसर्गिक देणग्यान त्याच्यासारखा सुखी राजा सुद्धा नाही. राध रंकाचा तो अन्नाच्छदन दाता. * आठ वैल दोन म्हशी. विहीर पाण्यासरशी; मग भोजराज कः पदार्थ. " * ज्याच्या घरी काळी ( म्हैस ) त्याला नित्य दिवाळी. " अशी त्याच्या घरची स्थिति असते. बारा बलुते व वारा आलुते त्याच्या सेवेस तयार असतात. धर्मराजाने अनुऋणीच अप्रवासीच शाख पचति स्वगृहे अशी सुसाची व्याख्या केली आहे, ती बळीराजास बरोबर लागते. इंग्रजी राज्यात गैर माहिती मळे व धन तृण्णेमुळे मोठी चूक होऊन जमिनीवरील शेतक-यांची सत्ता नाहीशी केली, जमीन जप्तीस पात्र केली. सारा का न भरला की जमीन जावी असे ठरविलें, यामुळे शेतक-याच्या सुखाची माती झाली. सरकाराच्या सोन्याच्या धास्तीस्तव सावकार घरांत शिरवावा लागला. ऋणाच्यापायी सर्वस्वामुद्धां जमिनी गेल्या. फार काय सांगावे. मनुष्य विकण्यास कायद्याने प्रतिबंध केला नसता तर शेतक-यांची बायको परे तर काय विचा-याचा देह सद्वां सादकारांनी विकन कोटच्या परवानगीने लिलावात घेतला असता ? एकीकडन सरकार देणे आणि दुसरी कडून सावकार देणे ह्या दोन लाटांत बिचारा शेतकरी सध्या पिळून जात काहे. अर्थातच त्याच्याच शेतात मजुरी करणा-या