पान:भवमंथन.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७५ ) पाहुण्यास सुद्धा मापल्याकडील गरीब लोक असे पैसे मागतील फाय १ केवढा इळकेपणा ! इकडील कामदार. इकडील कामगारांस मुलाबाळांची ताडातोड तितकी करावी लागत नाहीं. तरी आनंददायक आपले घर, आपले शहर, आपली जन्मभूमी, मापली वतन दारी, मुलेबाळे, कधी कधी धर्मपत्निसुद्ध, सोडून दूर देश रोजगारानिमित्त रहावे लागते. सरकारची चाकरी म्हणजे सुळावरील पोळी. मशिदीत दिवा लावण्याप्रमाणे वेळ संभाळण्यास जावे लागते. उन्मत्त अधिका-याशी गाठ पडली तर तरवारीच्या धारेवर असल्याप्रमाणे कामकाजात दक्ष रहावे लागते. त्यांच्या तोंडाशी बांधलेल्या कुत्र्याचे भोंकणे खाली मान घालून सोसावे लागते. प्रत्यक्ष बापाच्या क्रियेस किंवा मुलाच्या मुंजीसही रजा न मिळाली तरी चुरमुरे सात बसावे लागते. लाह्या फुटतात त्याप्रमाणे माणसे ग्रंथिक संनिपाताने मरत असत परदेशा एकाकी रहावे लागते. दोन प्राण्यांची मजुरी करणारा मजूर रावसाहेबांची नोकर माणसे सुद्धा जीवाच्या बचावासाठी निघून जातात. आपला परिवारसद् निर्मयस्थळी नेऊन ठेवून सर्वपक्षां श्रेष्ठ असा आपला जीव या आगीत देवावर हवाला देऊन ठेवणे भाग पडते. सारांश, मापढी स्वतंत्रता न विकणार व्यापारी आणि शेतकरी आपल्यापेक्ष पुष्कळ बरे असे त्यावेळेस कळून येते. व्यापारी. व्यापारी ह्याच्या अडचणी मागे कळल्याच आहेत. त्याखेरीज त्यांनाही व्यापार निमित्त विदेशी व्हावे लागते. मलास गमस्तगिरी करावयास लावावें लागते. सारांश, ते नोकरापेक्षा स्वतंत्र खरे पण स्वतःच्या हिताकरितां त्यांस परतंत्र नोकरापेक्षाही जास्त दक्ष रहावे लागते. शेतकरी. खरा स्वतंत्र एक शेतकरी खरा. त्याचा प्रपंच स्वतंत्र राज्यच आहे. तान्ह्या मुळापासून नव्वद वर्षांच्या म्हातान्यापर्यंत सगळी माणसे एके ठिकाणी