पान:भवमंथन.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७३ ) भयर की चूक झाली तर मतक्य अनर्थ मोढवावयाचे. इतक्या काळज्या ठेवून आपल्याप्रमाणे सगळ्या भूगोलावरील मंत्रयांच्या कारस्थानावर नजर ठेवावयाची, असे कोठवर लिहावें । पगाराच्या व लौकिकाच्या लालचेने हे काम करणाराच्या मनास विश्रांति, संतोष, सुरुतापासुन, परोपकारापासून व दानधर्मापासून मिळणारे समाधान किती होत असेल, त्याची मनोदेवता त्याच्यावर किती सुप्रसन्न असेल त्याचा विचार वाचकांनीच करावा. ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥१॥ सिव्हिलियन लोकांचे मोझ्यावारी पगार पाहून सामान्य लोकांस वाटते की, एवढ्या पैशाचे हे लोक काय तरी करीत असतील 1 लंकेप्रमाणे विलायतेतह्या लोकांनी सोन्याची घरे बांधली असतील. का पैवें भरुन ठेविली असतील कोण जाणे ! लंकेंत एका मनुष्याला एका दिवसाची मजुरी सोन्याच्य सात विटा मिळत असत. पण संध्याकाळपर्यंत सामान्य प्रकारे निर्वाह कर ण्यास जवळ जवळ खर्च तितकाच येत होता. तसाच प्रकार सिविलियनांचा हातो. त्यांचे ह्या देशांतील सर्च, मुलांच्या अभ्यासाचे खर्च वगैरे पाहिले म्हणजे पुष्कळ मुलेबाळे असली म्हणजे खर्चाची तोंडमिळवणी होत होताच मारामार पडते. ज्यास परिवार कमी आणि प्राप्ति ज्यास्ती त्यांच्यापाशीं माया जमते, ती मापत्या दृष्टीने फार मोठी दिसते. पण त्यांच्या देशातील खर्चाचे व पैशाच्या किंमतीचे मान पाहिलें म्हणजे देशी कामगारापेक्षा ते फार सुस असतात असे नाही. व्हाइसराय साहेबांस पगाराच्या लालचीस्तव सुखें सोडावी लागतात ती ह्यांसही सोडावी लागतात. मूल थोडेसे जाणते झालें कीं, पांच इजार कोसावर लावून आईबापस इकडे रहावे लागते. प्रपंचांतील सर्व माणसे आनंदाने एका घरात राहून सणवार करण्यांत किती आनंद आहे तो आ. पल्यास ठाऊक, त्या बिचा-याच्या नशिर्वी तो मुळीच नाहीं. संतति जाणता झाली की पशुपक्षी जशी ओळख विसरतात, त्याप्रमाणेच ह्या लोकांचा मुल्लाबाळांशी जन्म देण्यापुरता व पैसे भरून परमारे वाढविण्यापुरता मात्र संबंध राहतो. अर्थात्, प्रेम, ममता इत्यादि मानंदकारक प्रकार त्यस कामत नाहींत. पुढे बापलेक ह्यांजमध्ये केवळ तिन्हाइतासारखा संबंध राहतो. दोन दिवस ळेकाकडे बाप पाहुणा आला तर खाण्याचे बील पुढे येते. तिन्हाईत