पान:भवमंथन.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७१ ) हुकूमतून जाऊन सदा तुरुंगातच वास होतो. जो पगाराच्या बाहेर इच्छा करीत नाहीं तो मात्र सुखी रहातो. पण मोजका पगार दिमाखास पुरत नाहीं. निष्कटक मुलूख झाल्यामुळे वरिष्ट अमलदार चेपवा झाले, आणि कामगार पोटार्थी झाले, त्यास दुसरा आधार नाहीं; यामुळे अंमलदारास मान मुळीच राहिला नाही, वोज नाहीं. रयतेच्या देखत दुरुत्तरे वरिष्ट अंमलदार बोलतात. भलतीं सलतीं कामें धमविरुद्ध सुद्धा करण्यास लावतात. यामुळे अंमलदास वाटते की, आपल्या वर्षाच्या प्राप्तिइतकी कमाई एका सट्योत व्यापारी करितात. धिक्कार असा ह्या नोकरीला आणि ब्राह्मण जन्माला. सगळे काम करावे आम्ही आणि ओझ्यावरी पगार घ्यावा साहेबांनी. सुख माजकालकायतें साहेब लोकांत आहे. सिव्हलियनाच्या जागा आता आपल्यास मिळण्याची तर माशा नाहीच, पण कसेही करून आपले पुत्र नातू ह्यास विलायत क्षेत्र पाठवून मुद्रांकित करुन आणं म्हणजे त्यांस तरी सुख मिळेल. सिग्वािलियन गव्हर्नरापाशीं सुख मानतात राजेही मापल्या स्थितीने संतृप्त नाहीतच. ते आपल्यापेक्षा जास्त मुलुखाचें । राज्य करणाराकडे पाहून झुरत असतात. यामुळे प्रत्येक राजास आपला शेजारी शत्रु वाटतो. जो तो मापल्या परी धाकत दिवस काढतो. राज्य गहाण ठेवावे लागलें तरी पुरवले, सर्व रयत बेदील झाली तरी पुरवले पण सेना वाढवून आपल्या राज्याची शास्त्रीय सरहद्द आमका मुलुख गट्ट केल्यावाचून मजबूत व्हावयाची नाहीं करता तो काचीज केल्यावाचून सुख नाहीं. अशा प्रकारचे अनेक ध्यास राजास भोसकीत असतात. विद्यमान स्थितीत कोणालाच समाधान नसुन साभाळास हात लावण्यास जाणारा प्रमाणे सुखाच्यामागे मनुष्य मात्र लागले आहे. त्यास सुख एक मजल पुढेच दिसत आहे. सगळ्या लंकेतीळ वखें सरली तरी मारुतीचे शेपूट दोन बोटे मोकळे ते मोकळेच, सगळ्या गोकळीतील दोर दौ-या सरल्या तरी मगदंताची कवर दोन बोटे मोकळी ती मोकळीच, तसे पृथ्वीवरील सर्वं ऐश्वर्य प्राप्त झाले तरी आभाळाप्रमाणे सुख एक मजेल पुढे ते पुढे च । फेरतपासणी. राजास सुख नसते असे नुकतेच सांगितलें माहे व पूर्वी अनेक स्थळी