पान:भवमंथन.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६६) धानति वेदांत्याप्रमाणे वेदांताचा गंधही नसतां वागणारी सुशील, सद्वर्तनी, मितव्यय माणसे कोंड्याचा मडा करून वागतना क्वचित दृष्टीस पडतात. घरात पुष्कळ संपत्ति असतही हाय हाय करणारे थोडे नाहींत. देवदयेने संतति, संपात्त, सुशील भाय, घरदार वगैरे सर्व कांहीं थोड्याबहुतांत अनुकूल असतो त्यांचे चोज न करितां त्यांच्यातील व्यंगे शोधीत बसुन ती नसली तरी यळेच संशय घेऊन, माणि हे सध्या माहे खरे, पण हे निरंतर कसे निभेल १ खर्चाचे मान वाढत चाललें हा खर्च कसा भागेल ? बगैरे अनंत तक करीत बसून मड्याचा कोंडा करून, दैवाने दिलेल्या सुखानें सुखी न होता बळेच दुःखाचा घ्यास करणारे अभागीही क्वचित आढळतात, जण काय चाललेला थाट ह्यांच्याच सत्तेने चालला आहे. सारांश स्वमावपरत्वे सुखदुःखांच्या वेदना कमी जास्ती भासतात. यावरूनच सुखदुःखें मानलेली म्हणजे खोटी माहेत. स्वप्नातील भोग. जागृतींत पंचविषयांचा भोग होतो. तसा स्वप्नही होतो. जागृतींतील भोग सरा वाटतो, स्माणि स्वप्नातील मात्र खोटा वाटतो. विचार करून पाहिले असत त्यति स्माणि ह्यांत कांहीं फरफ नाही. जागेपणी एखादें प्रदर्शन पाहून पाठमोरे आलें की प्रदर्शन नाहीसे होते; पण स्मृति नाहींशी होत नाही. स्वप्नाबरोबर स्वप्नातील प्रदर्शन गेले, तसे जागृतींतील गेले नाहीं खरे, पण पाहणाराच्या दृष्टीआड झाले; तेव्हाच त्याला ते गेले. शिवाय ते चिरस्थायी नाहीच. केन्द्द तरी जावयाचेंच. मग दोहात फरक तो काय ! गायन जागृतींत ऐकूत संतोष होतो, तसाच स्वप्नांतही होतो. गायन गवयाच्या तोंडातन किंवा वाद्यांतून बाहेर पडले की गेलेच. सुगंध जागृतींत मिळाला काय आणि स्वप्नात भासला काय, संतोष सारखाच, स्पर्शसुखाच्या योगाने जागृतींत होणारा परिणाम स्वप्नावस्थेत प्रत्यक्षच घडतो. रससुखाचा भाग दोहींकडे सारखाच होतो. अनुकूल वेदना, सुख म्हणजे अनुकूल बेदना रसादिक मूर्त पदार्थांपासून होणान्या अनुकूल वेदना या मात्र सुख होत. रसादित मूर्त पदार्थांचा परिणाम शरीरावर होतो तो सुखापासून