पान:भवमंथन.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६४ ) विवर्त. पृथ्वीवरील सर्व पदार्थांचा व प्राण्यांचा उभ्दिज, खनिज आणि प्राणि ह्या तीन कोटींत ( वगत ) समावेश होतो; पण विचाराने पाहिले असता तिन्ही टी पृथ्वीच्याच अशाने बनलेल्या आहेत. जेवढे जड तेवढी पृथ्वी, तो जळापासून उत्पन्न झाली. जल अग्नीपासून उत्पन्न झाले. अमी वायूपासून उत्पन्न झाला आहे. वायू आछाशापासून उत्पन्न झाला. आकाश मायेपासून भासमान झालें. आकाशाशी सलग्न नसतां मध्येच वायू संमवला. त्याप्रमाणे ब्रम्हाशी साक्षात् संवैध नसतां माया उत्पन्न झाली. तिची लीला हुँच ब्रम्हांड होय. ही माया आपल्या गुणमयरूपाने सर्व खेळ करीत आहे. गंधर्व नगर विषा मृगजल ज्याप्रमाणे दिसते पण नसते, त्याप्रमाणे हे ब्रम्हांड भारुड मज्ञान विवर्त अतएव मिथ्या आहे. कल्पती सूर्य सष्टी लय पावून सर्व तत्वें मायेच्या उदरीं लीन होतात. माया ब्रह्माच्या ठायीं लीन होते. सारांश, कल्पाच्या अंती ब्रह्माखेरीज काही रहावयाचे नाही, असा प्राचीन महाऋचा सिद्धांत आहे. सर्वाचीन तत्ववेत्ते ही सृष्टी चिरस्थाई समजत नाहीत, त्यांच्या मताप्रमाणे आपल्या सूर्यासारखे कैक सुर्य आपल्या अंगची उष्णता सोडून थंड। झाले आहेत. अर्थात् त्यांच्या ग्रहमाला नष्ट झाल्या आहेत. तशीच ही सृष्टीही छालेंकन नाश पावणार आहे. तात्पर्य दोन्ही काळातील तत्ववेत्यांच्या मते ही सृष्टि अनित्य आहे. ऐहिक सुखें भासमान म्हणजे खोट. श्लोक. इंद्रस्या शुचि शुकरस्य च सुखे दुःखे च नास्त्यंतरं ॥ स्वेच्छा कामनया तयोः खलु सुधा विष्टा च काम्याशनं ।। रंभा चाशुचि शुकरीच परमप्रेमापदं मृत्युतः ।। संत्रासोऽपिसमः स्वकर्म गतिभिश्चान्योन्य भावः समः ॥१॥ [सुभा॰] - मूळच खोटें. अनंत जन्मापासून ऐहिकसुसाच्या कासेत गुरफटून गेलेले मन त्या मुखाचे