पान:भवमंथन.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६३ ) सेल, त्या मानानें तो उंच वाढत जातो, नानाप्रकारे झाडांचे फुलांचे स्वरूप प्रकट करतो, तारे दाखवितो, आणि पाहता पाहतो ते झाड अदृश्य होते. त्याप्रमाणेच प्रारब्धाचे माने असेल, त्याप्रमाणे देडवृक्ष मृत्युलोकच्या रंगभूमीवर दिसू लागतो, तितक्यांतल्या तितक्यांत नानाविध बरेवाईट चमत्कार करुन दाखवितो, पूर्वऋणानुबंधानुरोधानें केकसि सुखदुःख दाखवून संचिताचा पुरवठा संपताच आदृश्य होतो. तस्मात हे शरीर केवळ भ्रातिरूप अनित्य नन्हें छाय ? शरीर अनित्य ठरल्यावर काय नित्य राहिलें ? देहाच्याच संबंधाने सर्व काही आपले म्हणविले आहे, त्यापेक्षा देह गेला म्हणजे सगळे त्या प्राण्याला गेलेच. नामरूपात्मक सृष्टि. वरील सर्व मनित्य असो, पण ही अपार सृष्टि तर अनादिकालापासून चालत माळी आहेना १ हिला तरी नित्य म्हटल्यावाचून गत्यंतर नाहींना १ छे, छे, * यदृष्टं तन्नष्टं " हा सिद्धांतच आहे. सृष्टी पंचमहाभूतबाटत आहे. पंचमहाभूते वेगळाली काढून टाकता आली तर सृष्टी म्हणून कांहींच राहणार नाही. आपल्याला एवढा पसारा माणि ही नानाविधता दिसते, ही सर्वं नामरूपात्मक आहे. कोणताही पदार्थ म्हटला, तरी त्याला नाम माहे म्हणूनच तो समजतो आणि इतर पदार्थांपासून वेगळा ओळखावयास येतो. तसे त्याला कांहीं तरी रूप दिलेलें माई, म्हणून त्याला नवि देत आलें. कुंभाराच्या कारागिरीने तयार झा लेले सर्व पदार्थ म्हटले असतां माती. सोनाराच्या कौशल्याने बनविलेले पदार्थ सोने, चाँदी, मौत, जवाहीर वगैरे. साळ्याच्या करामतीने तयार झालेले पदार्थ कापूस, रेशीम, रंग, कलावतु इत्यादिं. त्या सर्वांचे वस्तुवार निरनिराळे ज्ञान होण्याकरिता व ते उपयुक्त होण्याकरिता व शोभेकरिता त्यांस निरनिराळे प्रकार च रूपें दिली आहेत, त्या त्या प्रकारांचा बोध होण्याकरिता निरनिराळी नांवें दिली आहेत. एकाच नांवाचे अनेक पदार्थ किंवा व्यक्ति असल्या तर त्या परस्परांपासून वेगळाल्या कळण्याकरिता त्यांस सुद्धा आणखी विशेष नांवे ठेवा लागतात. पागेतीळ घोड्यांस झंडी, महीताप, मनप्यारी, अशी निरनिराळी नावे ठेवतात.