पान:भवमंथन.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६१ ) स पडला नाहीं की लाखों आर्य म्हणविणारे लोक मरणाच्या पारी बसून राजाव्या व परदेशांतील लोकांच्या अनुकंपवर आपले जीग ठेवून त्यांच्या पायधरण्या करीत आहेत. एका क्षणापूर्वी सुखाच्या शिखरावर विहार करणारी माणसे दुसन्या क्षणी रंकाढून रंक बनत आहेत । राज्येची राज्ये उलथी पालथीं होत आहेत हे आपण रोज पहात आहों ! रावणापेक्षा जास्त दौलतदार कोण ? पण त्याला दुग्ध करतेवेळी त्याच्या दातांवर सोन्याच्या मेला मारण्यास सोने व घालण्यास रामराजाची परवानगी मागावी लागली ! सगळी लंदा ज्याची सुवर्णाची त्याची ही दुशा। असे ऐश्वर्य अशाश्वत म्हणजे मिथ्या आहे. ते मिळविण्याकरितां इतकी यातायात करून करावयाचे ते हाय १ तथापि सात पिढ्या पुण्याजोगी बेगमी असली तरी आणखी माणसी धनदौलत मिळविण्याकरिता अन्यायाचरण करून सदोदित माणसे हाइँ झिजवीतच माहेत, |ज्याचे प्रारब्ध त्याच्याबरोबर. ज्याचे प्रारब्ध त्याच्याबरोबर असते. स्वतःस सुद्धा नाहीं, मग दुसन्यास सुसी किंवा दु:खी करण्याचे कोणाच्या स्वाधीन आहे ! यःकश्चित सरदारा च्या पोटी येऊन छत्रपती केवढ्या योग्यतेस चढले माणि केवढे ऐश्वर्य गोळा करून व धनाच्या राशी साठवून ठेवून गेले ! खडॉगणती सोने, विस्ती मुलूस, कर्दनकाळ वीरमणी सरदार आणि हिंदुस्थानमर गाजलेले विक्राळ सैन्य छत्रपतींनी ठेवलेले असून संभाजीचा परिणाम काय झाला १ एकसारखे एक पराक्रमी आणि भाग्यशाली पुरुष निर्माण होऊन दिल्ली मटकेपर्यंत मुलखावर अंमल करुन सर्व हिंदुस्थानांतील द्रव्याचा मोघ पुण्यात आणून सोडणा-या चहापातशाहीचा व मटवंशाचा पत्ताही कोठे नाहीं ! मग यःकश्चित् सप्रितचे कपाळ करंटे आपण मिळविणार ते काय ? त्यातून ठेवणार ते काय ? आणि त्याने पढील पिढीस होणार ते काय ? कितीही असले तरी आपल्याच डोळ्यांदेखत काय होईल त्याचा नियम नाही, असे असतां पुढल्या पिढीची विवेचना करीत बसून आपल्या पोटास चिमटे घ्यावयाचे, विहित माचरणास फाटा द्यावयाचा, एका पैशाने दुसन्याचे मोठे हित होत असले, तरी तो पैसा साता वेष्टणांनी बांधून ठेवून त्याचे नुड़सान होऊ द्यावयाचे, ह्या आपल्या मागे लागलेल्या वेड्या • ११ ।।