पान:भवमंथन.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५७ ) एक वाढली काय १ " माया शोकं पुनमय. " वर पति गुणाविषयी सांगितले माहे ते स्त्रीलाही लागू आहे. | पुत्रशोकं निरंतरं. * पुत्रशोकं निरंतरं " म्हणतात, पण रोगी, पंगु, न मिळविते, असे पुत्र यांच्या आणि कर्ते, पराक्रमी, धन कनकसंपन्न, लोकिकवान् पुत्र ह्यांच्या शोकात तारतम्य नाहीं काय १ * कुसंतानापेक्षा निःसंतान बरे " असे पुण्यछोकामणी अहल्यामातेने स्वहस्ते पुत्रनाश करून सिद्ध करून दिले आहे. कन्याशोक. कन्या ती कन्याच. अगदी दुःखप्रद वाट्न परिणामी . सुखपद वाटणाच्या गोष्टींत कवीनें कन्यामरण दाखल केले आहे. पण हे कवि वाक्य सर्वसाधा. रण प्रचारापुरते आहे. नियमास अपवाद असतोच. एखाद्या घराण्याच्या अभ्युदयास आणि ख्यालीखुशाली चालण्यास धन्या कृन्याच साधार असली, म्हणजे तिच्या मरणाने पुत्रशोकाप्रमाणेच शोक होत नाहीं काय ! बाजारात निरनिराळ्या मालाला कमजास्ती. मौल पडते आणि त्या जातींत आणखी प्रती असतात, त्याप्रमाणे त्याच्या किंमतींत चढ उतार असतो. तोच प्रकार सुहृदाच्या शोकाचा नाही काय ? पति, पत्नी, सुत, सुता ह्या शोकाच्या मालाच्या जाती नव्हेत काय १ आणि संगण, दुर्गुण, महत्त्व, नीचत्त्व, उपयोग, निरुपयोग ह्या सदरहु मालाच्या प्रती नम्हेत काय । शौक सरोखर मृताकरिता असता तर इतके तारतम्याचे परिमाण स्यांत असते काय ? तात्पर्य, शक करणारा आपल्या हानीकरितां तिच्या मानाने रडत असतो. मायाजालाचे खरे स्वरूप लक्षात येत नाही म्हणून कोळ्याच्या किंवा धिवराच्या जाळ्यात सापडलेल्या माशीप्रमाणे किंवा माशाप्रमाणे माणसे विनाश पावून चौन्याशी लक्ष भवन्यामध्ये जीव सवंद धके सात आहेत.