पान:भवमंथन.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६ ) शौकी पैलवान, महंत, जोगी, गांजेकस, आफूमिया वगैरे लोक रात्रंदिवस आपल्याच नादात मग्न असुनकतेची विलकूल पर्वा करीत नाहीत असेही दिसून येते.

  • = * 1; F

= * * - या सन्मागत: न । । । कनक, कामिनी, शरीर, व्यसने ह्या सर्वांस तुच्छ मानून कांहीं नरपुंगव विद्यार्जनांत काळ घालवीत आहेत. आर्यभूमीतील अपार विद्याभांडार पाहतांच त्यास भुलून जाऊन परम कठीण परकी अशा संस्कृत भाषेचा अभ्यास करून कोणी ऋग्वेद पहात आहेत. कोणी योगमार्गाच्या पाठीस लागले आहेत. कोणी पृथ्वीवरील अनंत चमत्कार पाहण्यांत चूर आहेत. कोण ध्रुव प्रदेशाच्या शोधार्थ आपल्या जिवावर पाणी सोडून त्या उद्योगास लागले आहेत. कोणी आपल्या देशाच्या आणि राष्ट्राच्या क्लेशांचे परिमार्जन करण्याकरिता घरदार, स्वजन, धन, मुलेवाळे यांस अंतरून विलायतेस जाऊन तेथील न्यायप्रिय लोकांच्या दाढ्या हनुवट्या धरून आमच्या देशाची दाद घ्या ! फार हो फार आन्हीं गांजलों ! नका आता आमचा अंत पाहू ! आमचा छळ नका करूं ! सत्तेच्या बळावर कुर्बळांचा छळ करून कोण बरे केल्याण पावला आहे! ।' अशा विनवण्या कडून आपल्या अयुष्याचा काळ घालवून जन्माचे सार्थक करीत आहेत. सार काय तो परोपकार माहे, असे मानून देशोदेश सत्यधर्माचा प्रसार करण्याकरितां कोणी व्याख्याने देत आहेत, विद्यापीठे स्थापन करीत आहेत. कोणी ह्या संसारातील सर्व व्यवहार नश्वर मानून व घातक समजून, वेदतिशास्त्राचा अभ्यास करून वेदांत अंगीं बाणून विरक्त धादांत बनून ईश्वराशी ऐक्य करण्याच्या खटपटीत गुंग झाले आहेत. कोणी तीर्थाटणे, जप, तप, प्राणायाम करण्यांत गुंग आहेत. १२ ते 21 - - देशतिलक. 11: 39-477 निरुपद्रवी लोक कल्याणास साधनीभूत असा धंदा करून आपल्या कष्टाने निर्वाहाची सोय लावून आपले तन, मन, धन आणि आयुष्य स्वदेशाच्या व राष्ट्राच्या कल्याणाकरितां उद्योग करण्याच्या पवित्र प्रयत्नांत घालवावे, मग सरकारची विनाकारण इतराजी झाली तरी चिंता नाही, प्राणसंकट आले तरी चिता नाही, अशा निश्चयाने वागणारे, देशास भूषणभूत तिलकही कांहीं आहेत.