पान:भवमंथन.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५ ) सुचावयाचे नाहीत हे कांहीं सोटें नाहीं; पण सर्व माणसे केवळ पोटार्थीच व्हावी आणि अन्नाच्याच मागे लागावी, अशी विपन्नास्थति जगाच्या मागे ईश्वराने लाविलेली नाहीं. पुष्कळ हरीचे लाल अशा स्थितीत आहेत की, एकाच पिढीत नव्हे, सात पिढ्यांत सुद्धा त्यांस निर्वाहाची काळजी करायास नको. त्यांनी तरी स्वस्थ असाचे ना! पणे अनुभव अगदी उलट आहे. जितका धनसंचय जास्त तितका व्यास जास्ती; तसेच जितका हव्यास तितका व्याप, आणि व्याप तितका संताप. तस्मात् केवळ पोटाच्याच लफड्याकरितां सर्व खटाटोप आहे, असे नाही. पोटाचा लफडा अपरिहार्य आहे, त्याच्याकरितां खटाटेप केल्यावांचून गत्यंतर नाहीं हे खरे; पण त्याशिवाय | - आवडता हेतु कांहीं निराळाच असतो. द्रव्यासाठीं की काय ? * पोटाची काळजी नसताही व्याप सुटत नाही, त्यापेक्षा, सगळ्या जगालम द्रव आणून गुंग करून टाकणारे जे द्रव्य, त्याचे साठीच खटाटोप असावा. द्रव्याच्या इच्छेस कधीच तृप्ति नाही. पृथ्वीवरील सर्व ऐश्वर्य, सर्व स्त्रिया आणि आकल्प आयुष्य एका पुरुषास प्राप्त झाले, तरी त्याला ते पुरेसे व टून आतां नको असे कधीच वाटणार नाही, असे ययातीने पुरूस म्हटले आहे. अशाही द्रव्याची पर्वा न करतां तीर्थयात्रा, ब्राह्मण संतपणे, अनाथदुःखनिवारण, धर्मशाळा, रुजापायशाला, अन्नसत्रे, विहिरी, तलाव वगैरे शेकडो सत्कृत्ये करून त्या द्रव्याचा सद्व्यय करणारी अहल्यामातेच्या पंथांतील पुण्यदान माणसे कीर्तिरूपाने चिरंजीव झालेली आढळतात. अन्यपक्षी दुर्व्यसने, नाच, तमाशे, आणि ख्यालीखुशाली ह्यांतद्रव्याचा फडशा उडवून दुलोकिक आणि दुर्गतीची सामग्री जोडणारेही पुष्कळ दृष्टीस पडतात; तेव्हा द्रव्यासाठी हा खटाटोप आहे असेही म्हणवत नाहीं. F स्त्रीसाठी आहे काय? न , करू नराला मोहून, त्याच्या चिंधड्या करून, त्याला दुर्गतीस पोहोचविणान्या भांगार सोने आणि कांता ह्या दोन कातल्या आहेत. भांगाराचा वर विचार झाला. आता हा खटाटोप कांतेकरितां असावा असे वाटते, पण शरीरबळाचे