पान:भवमंथन.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५३ ) तथापि ते नाखुषी दाखवितो कामा नये. माझी मनधरणी केली पाहिजे. मी मेलों असता तुझे वय तिी लहान असो किंवा प्रौढ असो, तरी दुसरे लग्न कृरिता कामा नये. कडकडीत संन्यास बताने वागले पाहिजे, असे किती मणन सांगू. मान, सत्ता, सुख, दुःख काय ते मला माहे, तू म्हणजे माझ्या सुसाखातर व सोयीखातर एक चालतें बढते यंत्र मात्र परमेश्वराने निर्माण केले माहे, त्याला मान, सत्ता, मनोविकार काहीच नसल्याप्रमाणे मी ठेवीन त्या स्थितीत तू मानंदाने राहिले पाहिजे. मला वाटले तर मी तुझा मक्त बनून तुझी पूजा करीत जाईन, नाहीतर पोते-याप्रमाणे वागवीन. इतक्या शर्ती जर तुला, किंबहुना तुझ्या मातापितरस किंवा पालकीस आवडतील माणि ते मला माझ्या घरच्या दासीयटकसुद्धा आणि इतन्यसुद्धा बहुमान देण्यास कबूल नसतील तर त्यांनी माझ्याश तुझा संबंध करावा. तर कोणी तरी इतकी पीडा पतकरील असे वाटते काय ? पण सगळे जग ही पीडा पतकरूनच आपल्या पोटच्या गोळ्पाच्या जन्माचे सार्थक झाले असे मानून चालत आहे. मुलगा. कोणी कोणास म्हणेल की, एकदा टफजीती होऊन [ मुलगा मरून ] पाण्याच्या थैलाप्रमाणे फेरे तू घालीत माहेस, तथापि जर तुला माझ्या मागमनाची इच्छा असेल तर ते रात्रंदिवस मजकरिता माशा करीत बैस, देवास नवस कर, पिंपळाचे पार सिजाव, सायास कर, व्रते, दाने, उपास कर; पण येवढे पके लक्षात ठेव की, मी येण्याचा संभव झाला पुरे, की तुझ्या आणि तुझ्या कलत्राच्या प्रेमसुखात मी विघाड करीन. काही दिवस तर वियोग घडवीनच घडवन, तुझ्या कलत्रास अन्न गोड लागू देणार नाही. अनंत यातना सोसण्यास लावून, तुमच्या लाडक्या लेकराची दुर्दशा करीन. मरते हैं जगते अशी त्याची स्थिति करीन. माझ्या प्रत्यक्ष दर्शनाचा समय तर इतका भयंकर होईल, की ते दिवशी तुझ्या कलत्राचे प्राण अत्यंत धोक्यात राहतीळ. निभले तर पुढे काही महिने त्या दुखण्यांतून नीट होण्यास लागूनही पहिल्याप्रमाणे शरीर होणार नाही, व ताकद रहाणार नाही. तुम्हा उभयतांच्या खापापिण्याच्या उत्तम उत्तम पदार्थांवर लवकरच जप्ती ठेवीन. त्यातूनही कठिी तुम्ही तोंडात घातले तर त्यातूनही विमाग घेण्यास सोडणार नाही.