पान:भवमंथन.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५० ) म्हणजे मी तुझे सहचर्य पतकरीन. हे मात्र लक्षात असू दे की, मी आपले आईचाप, त्यांचा परिवार, इष्टमित्र सोडून ज्याप्रमाणे तुझ्या एकट्याच्या अंकित होईन त्याप्रमाणे म झै साहचर्य झाल्यावर हळू हळू तुला करायाला लावन, मी तुला कांहीं काल इच्छित सुख देईन, पण मी आपले मन सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करीन असे मात्र समजू नको हो; नाइलाजास्तव तुझ्या छंदानें जितके वागणे मागच पडेल तितके मी वागेन. पण मी आपला छंद कधी सोडणार नाहीच. माझे सुख मला जितके साधता येईल तितकें साधण्यास मी कधी कसुर कर णार नाही. तुझा हात तंगी असला तरी माझे चाळे कमी जास्त मानाने चाळ. लेच पाहिजेत. तू उघडपणे न चालू दिलेस तर मी लपून छपून चालवीनच. ते पैसा न खचून पाहिजे तर लोकांशी वाईट हो, पण तुझ्याच पेशावर मी भलेपण भोगीन. तुला कर्ज होवो, तुझी फजिती होवो, की कांहीं होवो, मी हाल भोग णार नाही, मी आपला दिमास कमी होऊ देणार नाही. तुझ्या देवाने मल चांगली व द्वे दिली तर चांगले वर्तन करीन, नाही तर पाहिजे ते दुष्कर्म करून शेवटी तुला मफू सुद्धां खाण्यास लावीन. इतकेंही पतकरलेंस तरी मी तुझ्या सुखाचीच सोबती. तू म्हणशील पुराणांतील महा साध्वी स्त्रियांप्रमाणे मी आपल्या सुखाकडे यत्किचित् लक्ष न देता तुझी सेवा अनन्यभावे करावी, मी केवळ तुझ्या सुखाकरित , तर ते दिवस गेले. ती भ्रांति माती ठेवू । नको. मी आपल्याच सुसाकारतां तुझे साहचर्य पतकरलें आहे. त्यापेक्षां तुझ्या सहवासाने मला सुख मिळेनासे झाले तर मी तुला टाकून जाईन. अथवा दुसरे कांहीं कारण झाले तर मला जावेच लागेल. तेथे तुझे मगर माझे कांहींच चालणार नाही. माझे इतके सोलवाड पुरविण्याकरितां तुला पाप लागले तर त्याचा लेशही मी घेणार नाही. तुझ्या सुरुततील निम्मे वटा माले मी चोपून घइन इतकेच नाही, असे सुझतीतील समर सुकृत मी तुला देणारे ना. तुझेच खचून मी सुरुत केले तरी ते माझेच, पण मी आपल्या पापाच निम्मे वोटा तुझ्या बोकांडी बसवन. इतक्या शत पतकरून कोणी तरी को णाचे साहचर्य पतकरील काय ? एखाद्याने पतकरलेच तर त्यास आपण वेडापीर नाहीं का म्हणणार ? पण जरा विचार करून पाहिले तर सगळे लफडें आपल्याच गळ्यांत येते. माणि सगळे संसारीकहीं आपल्याप्रमाणेच लफड्यति