पान:भवमंथन.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १ ) विकणारे किंवा मोबदला देणारे आणि तिच्या जन्माचे मातेरे करून धन गोळा करणारे मार्जारवृत्तीचे ( पोरे-खाऊ ) लोकही आढळतात. तात्पर्य, ममत्व ( आपलेपणा ) तिच्या ठिकाणीं न मानल्याकारणाने असा प्रकार होतो. प्रत्यक्ष प्रमाणे. माया केवळ मापल्या मतलवाकरितां आहे ह्याविषयी आणखी प्रत्यक्ष प्र. माणे पहा. निर्मळ प्रेम करणारी कलत्रे यांचा केवळ तादाम्य झाल्याप्रमाणे संबंध असतो. त्यांच्या प्रांतात बिघाड होईल असे त्यांच्या स्वप्नात सुद्धा वाटत नाहीं. उभयतांहीं सद्वर्तनी व सुशील असतात. दैवयोगाने संततीचा भाव किंवा दुसरे एखादे कारण यानिमत्त संसारात न्यूनता भासू लागली म्हणजे ती सुशील पत्निच प्रपंचाची पूर्णता संपादन करण्याकरिता नवन्याच्या गळ्यात द्वितीयसंबंध मोठ्या हौसेने बघिते. सवतीचा व मापला बेबनाव न व्हावा म्हणून मोठ्या चातुर्याने सावधगिरी ठेवून आपली सहोदरी किंवा दुसरी एखादी जिव्हाळ्याची मुलगाच तिने सवत केलेळी असते. इकडचा सुर्य तिकडे उगवेल, पण आपल्यास जीव की प्राण मानणारे यजमान आपल्यावरील प्रेम कमी करणार नाहीत. कार्याकारण दुसरी बायको केली म्हणजे प्रीतीचा विभाग होईल सरा, परंतु आपल्या मनास खेद होण्याजोगी वागणूक खचतच स्यांजकडून होण्याची शंकाही मनांत आणण्याचे कारण तिला वाटत नाहीं आपल्या सुनेप्रमाणे, निदान मुलीप्रमाणे किंवा बहिणीप्रमाणे मी तिला वागवन असे तिला वाटत असते. मानवी स्वभावात आणि विशेषकरून स्त्रीजातींत महंभाव व असूया ओतप्रोत भरलेली आहे. जे असावे ते मला असावे, सत्ता, मान काय तो मला असावा, नव-याने माझ्या मुठीत राहून माझ्याच मोंजळीने पाणी पावे असे स्त्रियांस वाटत असते. ज्येष्ठ पत्नीचे मनोरथ बरेच पूर्ण झालेले असतात. तिनेच कारणाकरितां दुसरी करून दिलेली असते, म्हणून ती आपल्याक डून धाकटीच्या मर्जीस दुखवीत नसते. पहिल्यापासून ज्येष्टे व्या हाती असलेली सत्ता त्या नव्या पोरीच्या हातीं एकदम साहजिकच येत नाही माणि त्यावलचा. कल्पनाही थारलांच्या मनात फारशी येत नाहीं. धाकटीचा प्रवेश झाल्यानिबरोबर तिचा प्रयत्न सर्व सत्तासाहेबीण होण्याचा चालू होतो. तिला व ४ चें