पान:भवमंथन.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४६ ) धर्मसंतान, कन्या बोलूनचलून धर्मसंतान. तिचे सर्व जीवित पराधीन. तेव्हा तिजपासून मातापितरांस काय सुख होणार ? तिलाच त्याची जन्ममर माशा असणार. तिची एक कवडीसुद्धा मातापितरौस शिवनिर्माल्य मानली पाहिजे. ती काळजीचे मूळ होय. कन्येच्या उदाहरणावरून माया केवळ मोबदल्याकरित आहे, हे ततोतंत ठरते. कन्या आणि पुत्र ह्यांच्यांत तत्वतः पाहता तिळमात्र तरी फरक माहे काय ? तनय काय आणि तनया काय दोन्ही तनूद्ववच. असे असतां कन्या झाल्याचे ऐकिल्यावरोवर तीर्थरूपाचा मुखचंद्र म्लान को बरे व्हावा १ घरातील सर्व माणसे खटू कां व्हावी १ परक्यांनी सुद्धा ना को मुरडावी १ तन मन धन सर्वं तनयाला अर्पण करून मरेपर्यंत देह झिजवून आणि पापताप जोडून आणखी त्याची मरती करण्यांत मोठा आनंद मानतात; पण तनयेच्याकरिता तिच्या विवाहकालीं एक वेळ मापल्या शक्तीप्रमाणे खर्च करण्यास मात्र प्राणसंकट वाटते. खरे पाहिले तर एकदां खर्च करून तिला भरल्या गव्हाणीत बोटले तर त्या घराण्याच्या मोठ्या संपत्तीची ती मालकीण होते. हा मोबदला लहान आहे काय ? वेडी समजूत. हातचे पदरचे सर्व खर्चुन पुत्राला वाढविलें, वर्तविले, विद्यालयात पाठविले, म्हणजे तो भाग्यवान होईल असा, आणि झालाच तर आपल्याला सौख्य देईलच असा तरी नियम आहे काय ? पुत्र सुशील निघाला तरी म्हातारपणी गोळाभर अन्न, साधे वस्त्र, आणि सुखाचा शब्द ह्यापेक्षा कशाची अपेक्षा मातापितरस असते १ मुलाच्या उत्कृषमुळे त्यास होणा-या सुसानेच आईबापस सुखी व्हावयाचे असते; तसेच मुलीच्या सुखानेही सुखी होता येत नाही काय ? आणि ती सखी होत नाहीत काय ? मलीच्या अनेक अड चणाची जबाबदारी तर तिच्या घराण्याकडे असते. तेव्हां मुलापेक्षा सुद्धा मुलाच बरी, पण अनादिकालापासून हाडी खिळलेल्या वेड्या समजुतीमुळे मुलाचे सुख व भाग्य ते मात्र आपले, आणि मुळीचे ते परक्याचे. मुलगी परधन, असा ग्रह बनून गेला आहे, ह्यामुळे केवढा अनर्थ झाला आहे पहा. तनय न ) करण्याकरिता किंवा त्याचा ताळराम गार करण्याकरितां तनय।।