पान:भवमंथन.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३६ ) एक वेळचे असुन किळस का ?-मी उटें निरंतरचे असुन ह्याच्याविषयी इतका प्रयत्न कां च ! आम्ही प्रजा, मामचे लालनपालन कन्यावासल्याने करण्याचा अधिकार विसरून विपरीत इच्छा करावी काय १ ह्या दुष्ट वासनेने रावण दुर्योधनादिक ऐश्वर्यास, प्राणास आणि कुळास मुकले हैं नाही का ठाऊक १" बोध काना पड़ताच दिवाणजीची अछछ जाग्यावर आली. त्यांनी त्या चातुर्यसाणास साष्टांग नमस्कार घातला, आणि मातोश्री, झालेला अपराध क्षमा करा असे झटले. तेव्हा हेच खरे, तर आतां जेवण करून जावे असें ह्मणून तिनें निराळ्या जागी मांडलेल्या पानवर उभयतास बसवून जेवण्यास घालून संतुष्ट करून दिवाणजींची बोळवण केली. गोष्ट ३.-प्रसंगावधान. एक सद्गुण स्त्री एका खिंडीतून जात असताँ एक हत्यारबंद चांडाळ तिला मोहित होऊन तिच्यावर बलात्कार करण्यास सिद्ध झाला, कोणी त्राता तर नाही, प्रसंग तर वाका, असे पाहून तिने लागलीच त्यास अनुकूलता दाखविली, आणि त्यास विश्वास येण्याकरिता वखा बाई त्याग करून जागा साफ करण्यास सूचना केली. कामातुर मनुष्यास विचार थोडाच, त्याने समशेर साली ठेवली, आणि वाकून जागा साफ करू लागला. इतक्यांत त्या पटाईत स्त्रीने त्याचीच तरवार घेऊन त्याची खांडोळी करून टाकि ! सूचना. सद्गुणी कुलवधून, वर लिहिलेली व तशाच प्रकारची दुसरी स्त्रीचरित्रे जी जी तुमच्या कानी पडतील ती तुम्ही आपल्या हृत्पटिकेवर कोरून ठेवून वारंवार ती आठवीत असा, मगनने, उभय कुलोद्वार करण्याचा अधिकार तुम्हांस आहे, तसा पुरुषांत नाही, म्हणून तुमची योग्यता कांकणभर जवादच आहे. पुरुषांनी कितीही दिमाख केला तरी मातोश्री म्हणून त्यांना तुम्हॉसच वदन केले पाहिजे. योग्यतेचरोवर जबाबदारी वाढत असते. तुम्ही दुर्वृत्त झाला तर उभय कुलांस नरकांत ढ लाल हे लक्षात ठेवा. परमेश्वराने तुमच्या ठिकाणी मोहकपणा ठेविला आहे. तेवढ्यावर तृप्त न होऊन विचारे पुरुषांनी नानावस्वाभरणे व अलंकारभूषणें आपली कमाई खचून तुम्हांवर चढविली आहेत, तेणें