पान:भवमंथन.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३५ ) ओळखून दप्तरदारास एकति बोलावून झालेल्या गोष्टी बद्दल क्षमा मागून घेतली, व पुनश्च कुलवधूवर कन्यावात्सल्य ठेवण्याविषयी शपथ घेतली. दप्तरदारानें यथास्थित कान टोचून दप्तर खुले केले. गोष्ट २.--चातुर्यखाणी. पुण्यपत्तनांत एका गरीब साध्या भोळ्या कारकुनाची स्त्री केवळ रंभा होती, तिला पाहून दिवाणनी दिवाण झाले. त्यांनी त्या कारकुनाशीं विनाकारण धुसफूस चालविला. विचारा कंटाळला. कारण ते त्याच्या भोळ्या मनास कळेना. एके दिवशी तो खिन्न होऊन बसला. दिवाणजीकडून अंतस्थ खटपट चालली होती व यजमान धुसफुशचिद्दल नेहमी बोलत होतेच. तेव्हा सुताने स्वर्गात जाणा-या त्याच्या स्त्रीने सर्व कवटाळ ओळखून यजमानांस विनंति केली की, माझ्या सांगण्याप्रमाणे चालाल तर ही झटकट मी नाहीशी करून टाकते. तिच्या चातुर्यावर व करतबगारीवर यजमानांचा पूर्ण भरंवसा होता, व धुसफुशोमुळे त्रस्त झाले होते म्हणून त्यांनी ती सांगेल तसे वागण्याचं कबूल केले. | दिवाणजीस आपल्या घरी जेवण्यास दोलवा असे तिने सांगितले. आपण पामर, आपल्या येथे ते कसे येतील, अशी शंका पतीने घेतली. तिने सांगितले तुम्ही बोलावण्याचा उशीर, ते एका पायावर येतील. कारकताने जाऊन विनंति करताच स्वारीने अमक्या वेळी सडाच येत असें कबूल केले. कार्कुनास मोठे माश्य वाटले. भोळा विचारा ! विधि, हरि, हर सुद्धा स्त्रियांचे दास झाले हे त्याचे लक्षात येईना. कीचक ज्याप्रमाणे दिवस केव्हा मावळेल म्हणून वाट पाहत होता, त्याप्रमाणे दिवाणे दिवाणजी वेळेची वाट पाहून वेळ होतच बोलावण्याची सुद्धा गरज न ठेवता इनर झाले. | स्त्रीने लागलेच एक पान वाढून पतीस त्या पानावर जेवण्यास बसण्यास सांगितले. दिवाणाच्या समझ तो कारकून एकटा जेवण्यास बसला. प्राणाहुति घेऊन दोन घांस घेताच उठण्याविषयी बायकोने सांगून दिवाणास पाठविण्यास सांगितले. दिवाणजी येताच उष्ट्या पात्रावर बसण्याविषयी खूण केली, दिवाण खजील होऊन चाकत उभे राहिल्यावर ती चातुर्यखाणी ह्मणाली, "हैं उष्टें