पान:भवमंथन.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२८ ) तात्विक दृष्टि.. = खरे म्हटले तर गायनात आहे काय १ बावन वणींतलेच वर्ण. ते स्पष्ट अर्थबोध होण्याजोगे न म्हणता बळेच हेल ओढून, कैप देऊन, माछाप लांबवून, शब्दछळ करुन म्हणावयाचे ! त्या हेलास, आढ़ापस आणि कंपास कहीं नियमचद् करून ते नियम हेच गायनाचे मर्म असे ठरवून शास्त्र बनविलें. एक खरी गोष्ट सिद्धांत म्हणून सांगून तिला अनेक प्रकार लावून दाखवून ती छोटी असती, तर असे झाले असते, तसे झाले असते, अशा अनेक गोष्टी प्रमाण म्हणून दाखवून तसे कांहीं होत नाही. तस्मात् हा सिद्धति सत्य आहे, हे सिद्ध झाले असे भमितीमध्ये सांगतात. त्याप्रमाणे गायनाचे मनःकलित नियम बांधून बळेच अवघड करून ठेवून तो अवघडपणा ज्या नियमांनी आणिला, ते नियम ओळखील तो दर्द म्हणावयाचा, पूर्वोक्त दागिने सराफ ज्या नजरेने पाहतो त्या नजरेने तात्विक विचार करणारा गायनाची चिकित्सा करू लागला, म्हणजे त्यास बावन वणीशिवाय आणि सरळ अर्थाशिवाय कांहींच दिसत नाही. नादलुब्धांकरिता किंवा रसिकांकरितां केलेले अनेक खटाटोप, कोट्य, अलंकार, रस, गुंतागुंती, वगैरे ह्याँस तोंडाळ किंवा गावागुचा ह्याप्रमाणे हिणकस समजतो, माण त्यामुळे अर्थबोधाला कमीपणा येऊन * अर्थ लोपले पुराण, अनर्थ केला शब्दज्ञानी' मस त्याच्या मनाचा सिद्धांत होतो. | ऐकणारांची कां गर्दी ? नुसते नादात्म गायन जर रमणीय असते, तर सशाख गायन करणाच्या गवयाला वायु झाला, असे समजून गांवढेकरी त्याला डाग देण्यास निघाल्याची गोष्ट सांगतात; तसा प्रकार न होता, हिंदुस्थानी गाणे सुरु होतांच “ आम्हांस त्यात काही कळत नाही असे म्हणून गतानुगतिक नसणारी माणसे उठून जातात तशी न जातीं. लावण्या, छकडी वगैरे साम्य गाणी ऐकण्यास गर्दी होते तशी गवयाच्या गाण्याला को होत नाही ? लावण्या, छकडी ह्यांच्या गाण्याच्या म्हणजे सुराच्या रमणीयतेरतवच लोक जमत नाहींत. त्यांतील शब्दांच्या अर्थाने त्यांचे मनरंजन होते, किंवा हावभाव व नट' पाहून जे लुब्ध होतात, त्याच लोकांची गर्दी असते, ..