पान:भवमंथन.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२० ) उर्जितकाळ आणीले, म्हणून सर्व लोक आशा करून बसले असतां भर तारप्यांत त्यावर धाड घालण्याचे पाप त्याच दुष्टाने पदरी घेतलें !! मृत्यूचा कहर. आज राजाच उचलून नेऊन सगळा देश शोकसागरांत लोटला ! आज काय अंधाची काठीच घेऊन गेला ! सगळा स्वयंपाक मोठ्या मेहनतीने संपादन करून ताट वाढावे, आणि तोंडाँत घाँस घालणार त दुष्टानें ताट उचलून न्याचें । भर तारुण्यात येऊन वल्लभाच्या मेटीविषयीं कुलवधु आतुर झाली असून एक एक दिवस युगाप्रमाणे काढीत असतो, वल्लभास काळाने ओढून नेल्याची वज्ञपाततल्य यातमी येऊन धडकत माहे !! शेकड मलें पौरक होत माहेत, म्हातारी मातापितरे पुत्रशोकाने विव्हळ होत आहेत, अबला निराश्रित होत आहेत, असा प्रकार होत असतो, असल्या मृत्युलोकांतील मापण वेड माणसे दोन दिवसांच्या बाजाराकरिता लोकांच्या मुंड्या मुरगाळीत आहों ! नानाप्रकारे लोकसि लुबाडीत माह ! सर्वांच्या तोंडातील बेडूक माशा गिळीत असतो तसा हा प्रकार नव्हे काय ? ह्या एकाच गोष्टीवरून संसार केवळ दुःखगारकांनी भणाणलेली खाई आहे, हे उघड आहे. महिमुखगतभेकस समृद्ध मानत आला तर संसार सम्यकसार ह्मणतां येईल, नाभीगत कस्तुरीच्या वासाच्या शोधाकरिता रानावनांत भ्रमण करता करता मृग मरून जातो, तरी त्यास ती प्राप्त होत नाहीं; त्याप्रमाणेच आनंदास्तव लक्ष चौन्यायशी योनीचे फेरे घेऊन घेऊन अनंत जन्मीं मन शिणते; पण त्यास निजानंद प्राप्त होत नाही. | सुकृत दुष्कृतः । संसाराचे दुष्परिणाम येवढ्याने संपत नाहींत. वर लिहिलेली सुखदुःखें या जन्म मात्र भोगण्याची आहेत. परंतु संसारसंगानें जो दुष्कृत्ये घडतात यांचा परिणाम फार दारुण आहे. त्याजबद्दल यमलोकीं शासन होऊन शिवाय जन्ममरणाच्या येरझारा भोगाव्या लागतात,