पान:भवमंथन.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११६ ) शेषशय्या शयनमुदधौ, वाहनं पन्नगारिः । स्मारं स्मारं स्वगृहचरितं, दारु भूतो मुरारी ॥ १ ॥ | (सु. भा. ) दुःखांत दुःख मरण. श्लोक सुगंधाच्या लोभे, भ्रमत मृग रानी वनिं सदा । शिणे पावे मृत्यू, परि न गवसे कस्तुर कदा ॥ निजानंदासाठी, भवउदधि मंथी मन पिसे । फिरे जन्मोजन्मीं, परि न सुख ते त्यास गवसे ॥१॥ (स्वकृत.) कांहीं तरी उणीव. एका व्यक्तीस संसारित दुःख झालें म्हणून काय झाले १ एका शितावरून सगळ्या भाताची परीक्षा करावी, आपल्यावरून जग ओळखावे, ह्या म्हणी भलत्याच ठिकाणी लागू पडत नाहीत. एक जीवराज दुर्दैवी म्हणून कांहीं सगळे जग तसे नाही. संसार दुःखमय आहे, की सुखमय आहे हे सामान्य विचार करून बहुजनसमाजाची स्थिति पाहून ठरविले पाहिजे. जगाकडे पहावें तर कोठे काँहीं कोटें कांहीं, एक माहे एक नाही असेच दिसून येते. जेथे दुव्याची समृद्धि तेथे मुलाबाळांचा तोटा. घर स्मशानासारखे भयाण. जेथे मुळालेकरांचा सुकाळ तेथे द्रव्याचे अनुष्टुप. अन्नं नास्ति वस्त्र नास्ति. दोन्ही माहेत तर शरीरास मयंकर व्याधि. तिन्ही आहेत तर नवराबायकोचा छत्तिसाचा आकडा. परस्परांचे स्वभाव विरुद्ध असल्याकारणाने रात्रंदिवस कटकट. ते ठीक असले तर भाऊर्बदुकीमुळे रोज सरकारदरचार आणि नानाप्रकारची लचांडै चालू माहेत. कोटें दुव्र्यसनाच्या सुकाळामुळे विपत्तीचे विलास चालू आहेत, घरादाराचे लिलाव होत आहेत. गोरगरीबाची काय कथा ! कोट्यवधि रुपये, सालाचे वसूल होणारे राज्य वडिलांनी कमावून ठेवले आहे; पण ते भोगण्याचे मालकाच्या प्रारब्ध नाहीं. नीच संगतीने वेडे विद्रे चाळे करू लागल्यामुले सार्वभौम सरकाराचा कोप होऊन पदच्युत्ति प्राप्त झाली आहे. कोणी राजे टिक्याचे धनी यजमान