पान:भवमंथन.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ (११० ) नसल्यावर पाक व्हावा कसा १ घरांत कोठे लाँच जरी धूर दिसला तरी ज्याचे मस्तक चढून डोळ्यास धारा लागून गंगा यमुनेचा संगम व्हावयाचा, त्याने धुराचे लोट सोसुन जाळ करून स्वयंपाक करावा, १ असो, अशा दुर्धर यातना त्यांजवर फोसळल्या, श्रीसत्यनारायणाच्या कोपाने साधु महाजनास, आणि शनि राजाच्या वक्र गर्ने राजा विक्रम च दुर्दशा प्राप्त झाली तसा प्रकार झाला. कालेंकरून सरकारच्या मनाची बाधा दूर होऊन पश्चात्ताप होऊन रावसाहेबांची मुक्तता झाली सर्व देशांस आनंदाचा दिवस उगवला. आ ता - ब्ण प्रवेश. | FF > कारागृहांत यजमान गेल्यावर परिवाराच्या, आल्यागेल्याच्या खर्चाकरिता आणि यजमानाच्या सुटकेकरिता, जवळ होता तितका पैसा खर्च झाला. * गेल्याचे धर 11 म्हणतात त्याप्रमाणे ज्याचे हात जे लागेल, ते त्याने गुड. ळले. लोकांकडे हजारों रुपये येणे होते, त्यांस फांवलें, तशसि दुष्काळ आणि ग्रंथिक सन्निपात ह्यांचा कहर लागोपाठ मागे लागला. दार ते नादार झाले, सर्व व्यापार जागच्या जागी नाहीसा झाला. पैसा नाहीसा झाला, खर्च कमी करतां येईना, तेव्हां उसनवारी सुरू झाली. पहिल्या पहिल्याने लोकांनी शब्द झेलले; पण पैसे परत जाण्यास विलंब लागू लागला तेव्हां अखडले. मग सर्व अपायांचा पाया जें कर्ज, ते घरात शिरले, आणि त्या लक्षाधिशा भोंवतीं आपलें जाळे पसरू लागले. पुढे तेही मिळेना, दिलेले परत मागण्याची बोलणी हळू हळू येऊ लागून शेवटी तगाद्यावर मजल येऊ ठेपली, तेव्हां सोने गहाण टाकून त्रास मिटवावा लागला. कि खांद्याखाली पदर. इतके झाले तेव्हां दृळू हळू नोकर चाकर कमी केले. घरची कामें घरच्या माणसांनच करण्याचा प्रसंग आला. मिजास नाहींशी झाली. वखें, प्रावरणे जेवणखाण बेवाबाचे साधे होऊ लागले. हे पाहून सुखाचे सोबती, भो ननं भाऊ, पाय काढून चालते झाले. फारच निगरगट होते, त्यांस तर जा म्हणावे लागले. ( हा प्रसंग मरणापेक्षां सुद्ध घरंदाज पिढीजाद्या गृहस्थांस जास्त कैश देतो ). होत होतां खासगत माणसे सुद्धा जड वाटू लागली, तोंड धरून बुक्याचा मार सुरू झाला. पंचप्राण मानलेले पांच पुत्र, यांस सुद्धा, बाबानें, आतां तुम्ही आपली सोय पहा, असे म्हणावे लागले. हे शब्द उच्चारतांना असे है