पान:भवमंथन.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म ( १०४ ) -25 = = ३

  • 'कबड्यास रत्न.
खेड, पुरंदर इत्यादि तालुक्यांत जमिनीचा तोटा असून भिमथडी, इंदापूर तालुक्यात त्या विपुल अाहेत. आणि मगदुराला फार ज्यास्त आहेत. एकेका कुळास पुष्कळ एकर जमीन आहे. पण संपन्न तालुक्यांतील रयत सदा निरुद्योगी, दरिद्री आणि कमी जमिनीच्या प्रांतांतील रयत हुषार, कष्टाळ आणि सुखी आहे. सरकाराने भिमथडी तालुक्यांत कालवा नला पण कवड्याला रत्न म्हणतात तसा प्रकार तेथील गैदी लोकांचा पहिल्याने होऊन पुरंदर तालु क्यांतील व दुसरीकडील उद्योग लोक तेथे जाऊन गवर झाले.

वाक्चक्षुः श्रेत्रलय लक्ष्मीः करुते नरस्य का दोषः । र गरल सहोदर जाता न मारयति यन्त्र तचित्र यश्रि ॥१॥ = मिजास व ताठा. = = = वैभव सुखकर वाटते खरे, पण ज्या गरीब मनुष्याला ते प्राप्त होते त्याच. ते प्राप्त होण्याच्या वेळची स्थिति आणि प्राप्त झाल्यानंतर बरेच दिवस गा ल्यावरची स्थिति ह्यांची तुलना करून पाहिली असता असे दिसून येते की, त्याचे शरीरसामथ्यं फार कमी झाले. त्याच्या आंगांतील चलता व तरतरीतपणा नष्ट होऊन जडत्व प्राण शैथिल्य शिरले. तो पुष्कळ परावलंबी झाला. त्याच्या डोकीवरील केर काढण्यास सुद्धा त्याला लाज वाटू लागली. तो मिजासखोर म्हणजे माळशी झाला. त्याला अन्न पचेनासे झालें, मेधोवृद्धि झाली. लहान लहान रोगांनी त्याच्या शरिरांत प्रवेश केला. त्याला गर्ने पछाडले. त्याला दुसरी माणसे करपटाप्रमाणे वाटू लागली. तो पूर्व पार विसरून गेला. पूजा माणसांशी नम्रता ठेवण्याचे भान त्यात राहिले नाही. वैभवरोगाने त्याचे कान गेले, डोळे गेले, सारासार विचारही गेला. द्रव्योन्माद हाच दुर्व्यसनांचा जनक आहे. आणि दुर्गति या दुर्व्यसनाची कन्या आहे. गर्वाचे घर सदा खाली आहे. गवं परमेश्वराला मुळीच आवडत नाहीं, ज्याला गर्व होतो तो फशीं पडणार असे समजावे. सत्यभामा, वलराम, मारुती, गरुड, भीम आणि अर्जुन अशा निस्सीम प्रेमांतील माणसांचा सुद्धा गर्व सहन झाला नाही. मग वरकडांची काय कथा ! आपल्या नावावर पाषाण तरले असा गर्व श्रीरामचंद्रास एकदां शिवला तोहि टिकला नाहीं. एकीकडे जाऊन एक खडा पाण्यात ट कुन पाहिला. तो लागळाच बुडाला. परमेश्वराला गर्व सोसत नाही ही समजूते । अभाविकांस पटत